- धुळे : हुंदाई कारमध्ये गुरांना कोंबुन त्यांची निदर्यपणे होणारी वाहतूक शिरपूर तालुका पोलिसांच्या पथकाने रोखत त्यातील चार गुरांची सुटका केली. चालकासह दोघांना ताब्यात घेण्यात आले असून कारसह गुरे, असा एकुण १ लाख १४ हजारांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला आहे.मुंबई - आग्रा महामार्गावरून सेंधवाकडुन शिरपुरच्या दिशेने हुंदाई कंपनीच्या कारमधून गोवंश जातीचे जनावरांची विनापरवाना कत्तलीसाठी वाहतुक केली जात असल्याची गुप्त माहिती सपोनि सुरेश शिरसाठ यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी शिरपुर तालुका पोलीस ठाण्याच्या गस्त करीत असलेल्या पोलीस अंमलदारांना संशयित वाहनाची तपासणी करुन कारवाई करण्याचे आदेश दिले. पथकाने पनाखेड गावाजवळ थांबून वाहनांची तपासणी सुरू केली. त्या दरम्यान संशयित हुंदाई कंपनीची कार आल्याने तिला थांबविले. चालकास विचारपुस केली असता तो उडवा - उडवीची उत्तरे देत असल्याने वाहनाची तपासणी केली. तेव्हा त्यात दोन गायी व दोन गोर्हे मिळाले. त्यामुळे एक लाख रूपये किंमतीची कार व १४ हजारांची गुरे, असते एकुण १ लाख १४ हजार रुपये किंमतीचा मुद्येमाल जप्त केला.
तसेच हबीब बुराखॉं कुरेशी (वय ३५) व शरीफ खॉं हब्बु खा (वय ३६ रा.जावरा मोहल्ला जि.रतलाम) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्यांविरुध्द पोकॉ संजय भोई यांच्या फिर्यादीवरुन भारतीय प्राण्यांना निदर्यतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याचा सन १९६० चे अधि,कलम ११(१)(घ)(डा(च) सह महा.प्राणी संरक्षण अधि. कायदा १९७६ चे कलम ५ व ९ तसेच मो.व्ही.क्ट कलम ६६/१९२(२) प्रमाणे शिरपुर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ राजेंद्र मांडगे हे करीत आहेत. ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनात पार पडली.

0 Comments