शिंदखेडा तालुक्यातील रुदाणे येथे वाळू भरणाऱ्यांना पोलिसांनी अटकाव केला. त्याचा राग आल्यामुळे पोलिसाला धक्काबुक्की करण्यात कालची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिंदखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुदाणे गावच्या शिवारात पान नदी आहे. नदीपात्रातील वाळू टॅक्टर ट्रॉलीमध्ये भरली
जात होती. त्याला पोलिसांनी अटकाव केला. त्याचा राग आल्यामुळे पिंटू नामक तरुण , नानाभाऊ पवार - भील , विशाल सखाराम , दिनेश यांच्यासह सुमारे सहा जणांनी वाद घातला. त्यानंतर शिवीगाळ दमदाटी करत पोलिसांना धक्काबुक्की करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पुढील तपास शिंदखेळा पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी करीत आहे.

0 Comments