Header Ads Widget

धुळे, तिसगाव ढंडाणे या परिसरात लिंबाच्या झाडावर वीज कोसळल्‍याने झाडाखाली बांधलेला बैल जागीच ठार



धुळे : धुळे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी संध्याकाळी विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. यामध्ये तालुक्यातील तिसगाव ढंडाणे या परिसरात लिंबाच्या झाडावर वीज कोसळल्‍याने झाडाखाली बांधलेला बैल जागीच ठार झाला.

शेती मशागतीच्या काळामध्ये बैलाच्या अंगावर वीज कोसळून दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे संबंधित शेतकरी चांगलाच संकटात सापडला आहे. रविवारी सायंकाळी अनेक भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. यात संध्याकाळी कापडणे परिसरामध्ये झालेल्या पहिल्‍याच पावसात भात नदी यंदा पहिल्यांदाच वाहू लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्यानंतर पेरणी झालेल्या शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागून होत्या. त्यानंतर आज झालेल्या पावसामुळे दुबार पेरणीचे संकट डोक्यावर घोंगावणाऱ्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

बैल दगावल्‍याने शेतकरी संकटात

वादळी वारा व विजांच्‍या कडकडासह पाऊस झाला. तिसगाव येथील शेतकरी गोपीचंद पाटील यांचे देवभाने शिवारात शेत असून शेतातील काम आटोपून पाटील यांनी कडूनिंबाच्या झाडाला बैलजोडी बांधून बाजूच्या शेतात बांधलेल्या घरात पावसामुळे आश्रयासाठी गेले. या दरम्‍यान निंबाच्‍या झाडावर वीज पडली. यात बैलाचा मृत्‍यू झाला. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.

Post a Comment

0 Comments