सविस्तर वृत्त असे की, आज दिनांक १८/०६/२०२२ शनिवार रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाच्या ध्येय धोरणानुसार आमच्या अगस्तमुनी माध्यमिक विद्यालयात इयत्ता १०वी प्रवेशित विद्यार्थी-पालक-शिक्षक मेळावा नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय मुख्याध्यापक आबासो. श्री.एस.ए.कदम व प्रमुख पाहुणे- विद्यार्थी- पालक ताईसो.श्रीमती सुवर्णा संजय पाटील व पालकवर्ग यांच्या समवेत विद्येची आराध्य दैवत माता सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
त्यानंतर प्रास्ताविक इयत्ता १०वीचे वर्ग शिक्षक श्री.पी.आर.पाटील सादर केले तद्नंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष व शाळेचे मुख्याध्यापक श्री.एस.ए.कदम यांनी पालकांचे व विद्यार्थ्यांचे उद्बोधन करतांना म्हणाले की,शाळा हे एक कुटुंब आहे;कारण जीवनरूपी प्रवासात शिक्षण हे एक महत्वपूर्ण अंग असून ते एक त्रिवेणी संगमासारखे आहे तर इयत्ता १०वीचे वर्षे हा सुद्धा महत्त्वाचा टप्पा असून अशा महत्वपूर्ण वळणावर आपण प्रत्येक क्षणाला सावध व जागृकतेने अभ्यासाची कास धरल्यास हे शैक्षणिक वर्ष यशस्वी करून दाखवू शकतो.विद्यार्थ्यांमध्ये विविध क्षमता,कला व सप्तगुण असतात.अशा कलागुणांना वाव देण्याचे कार्य शाळा व शिक्षक करीत असतात तर यात पालकांची हाक व विद्यार्थ्यांची साथ लाभल्यास जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही!
तसेच मुख्याध्यापकांनी पालकांना कळकळीची विनंती केली की,आपला देश हा कृषी प्रधान दश होय,ज्याप्रमाणे शेतकरी शेतातील पिकांचे संगोपन करतात त्याच पद्धतीने या आपल्या पाल्यांकडे थोड लक्ष दिल्यास त्यांच्या ही जीवनाचे सोनं झाल्याशिवाय वेळ लागणार नाही! व तसेच विद्यार्थ्यांची विकासाची कास धरण्यासाठी मुलाच्या हातातील मोबाईल सुटून हाती पुस्तकरूपी ग्रंथ आल्यास मानवी जीवन सफल होवू शकते ; व आमच्या माजी विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात मजली मारली असून अशी यशस्वी वाटचाल या आमच्या शाळेच्या माध्यमातून झालेली आहे . म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो वाचन हे एक मनाचे खाद्य असून वाचनाने मन शांत होत असते व वाचाल तर वाचाल या उक्तीप्रमाणे विद्यार्थी जीवनात "वाचन" हे शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावते म्हणून नेहमी विद्यार्थी मित्रांनो लेखन,वाचन,भाषण,संभाषण,श्रवण,ग्रहणात्मक प्रगटीकरणात्मक इत्यादीविषयी स्वानुभवावर मनोभाव व्यक्त केलेत.
यावेळेस कार्यक्रमास वरील मान्यवर,
पालकवर्ग,शिक्षक-शिक्षकेत्तर वृंद व विद्यार्थीवर्ग उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.एस.बी.भदाणे यांनी केले तर
आभार श्री.पी.आर.पाटील यांनी मानले.
0 Comments