अमळनेर : शिक्षण विभाग व व्होवेल्स ऑफ दि पीपल्स असोसिएशन (व्होपा) यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत शैक्षणिक साहित्य, शिकवण्याचे व्हीडिओ करून उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी अभिजित राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया , माध्यमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव, प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील, व्होपाचे संस्थापक प्रफुल्ल, ऋतुजा नेवे, उपशिक्षणाधिकारी विजय पवार, राजेंद्र सपकाळे हजर होते.
यावेळी ए.बी.धनगर करणखेडा, संजय कृष्णा पाटील मंगरुळ, डी.ए.धनगर अमळनेर, एस.ए.खांजोडकर अमळनेर, रोहन ज्ञानेश्वर पवार सावखेडा, महेंद्र पुरुषोत्तम पाटील, अमळनेर, संदिप भिका मोरे दहिवद, माधुरी भरत पाटील, रवींद्र देवरे अमळगाव, एच.बी. महाजन या शिक्षकांचा प्रमाणपत्र देऊन प्रातिनिधिक स्वरूपात सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे पिंगळवाडे प्राथमिक शाळा व जवखेडा प्राथमिक शाळा याना स्वच्छ शाळा पुरस्कार मिळाल्याबद्दल गटशिक्षणाधिकारी एस. पी. चव्हाण यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
व्ही स्कूल ऍप च्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील मराठी ,उर्दू ,इंग्रजी माध्यमातील विद्यार्थी कोणत्याही क्षणी शिक्षण मोफत घेऊ शकतात. अतिशय सोप्या पद्धतीने ,नैसर्गिक वातावरणात ,साहित्याचा वापर करून शिक्षकांनी मेहनतीने धडे ,प्रकरणे तयार केली आहेत. या कार्यक्रमास गटशिक्षणाधिकारी एस.पी. चव्हाण , भुसावळ चे गटशिक्षणाधिकारी वायकोळे , गटशिक्षणाधिकारी सुर्वे , व्होपा सदस्य आदिती ,राहुल , सुधीर, शाहिद तसेच शिक्षण विस्तार अधिकारी पी.डी.धनगर हजर होते.
0 Comments