Header Ads Widget

कृषी पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करताना कोणी पंचनाम्यासाठी पैशांची मागणी केल्यास संबंधितांची थेट कृषी विभागाकडे तक्रार करा



जळगाव : जिल्ह्यात कृषी पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करताना कोणी पंचनाम्यासाठी पैशांची मागणी केल्यास संबंधितांची थेट कृषी विभागाकडे तक्रार करा, जिल्ह्यात ८० टक्के पंचनामे पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडियाचे उपव्यवस्थापक अतुल झनकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कृषी उपसंचालक अनिल भोकरे, सहाय्यक व्यवस्थापक नितीन कुमार, जिल्हा प्रतिनिधी कुंदन बारी यावेळी उपस्थित होते. जिल्ह्यात लोकप्रतिनिधींकडे शेतकरी तक्रार करतात, की विमा कंपनीचे प्रतिनिधी पंचनाम्यासाठी पैसे घेतात. मात्र शेतकरी लेखी तक्रार देण्यासाठी पुढे येत नाही. ज्यांचे नुकसान झाले आहे, त्यांनी नुकसानीचा फोटो (जिओ टॅगिंग) काढून तो कंपनीकडे पाठवावा. जिल्ह्यात ११५ विमा कंपनीचे प्रतिनिधी पंचनामे करीत आहे. २० जूनपर्यंत स्पॉट पंचनामे पूर्ण होतील, अशी माहिती दिली.


जिल्ह्यात सर्व प्रकारच्या बियाणे, खतांची उपलब्धता आहे. कोणत्याही प्रकारची टंचाई नाही. शेतकऱ्यांना कोणी टंचाई आहे, असे सांगत असेल तर त्याची कृषी विभागाकडे तक्रार करावी, त्याची नावे गुप्त ठेवण्यात येतील असे श्री. ठाकूर यांनी सांगितले.बियाणे, खतांची टंचाई नाही

Post a Comment

0 Comments