Header Ads Widget

पथारे विकासो निवडणुकीत परिवर्तन पॅनलचा विजय डोंगरगाव



( प्रतिनिधी )आर आर पाटील.  शिंदखेडा तालुक्यातील पथारे   या गावात नुकत्याच झालेल्या विकासो निवडणुकीत डॉक्टर जयदीप गिरासे यांचा परिवर्तन पॅनल विजयी झालेला आहे यामुळे डॉक्टर जयदीप गिरासे यांचा सर्वत्र अभिनंदन होत  आहे

आज दिनांक  7.7.2022 रोजी पथारे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, मर्यादित-पथारे ता.शिंदखेडा जि.धुळे या संस्थेची चेअरमन , व्हाईस चेअरमन निवड घेण्यात आली .सदर सभेस संस्थेचे 13 उमेदवार हजर होते. चेअरमन म्हणुन श्री भोपाल मशिंद्र जाधव व्हाईस चेअरमन म्हणुन  श्री रविंद्र धुडकु गिरासे यांची बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे.  या निवडणुकीत गटनेते संजय जालिंदर यांचेही मोलाचे योगदान होते सदरच्या सभेस डाॅ जयदीप गिरासे यांनी  सूत्र संचलन केले व संस्थेचे सचिव श्री भटु याईस, बापु जाधव ,श्री विजु अण्णा,व गावातील इतर ग्रामस्थ उपस्थित होते.व  निवडणूक निर्णय अधिकारी म्हणुन श्री. एस झेड. चौरे यांनी कामकाज पाहिले. श्री अनिल पवार यांनी आभार व्यक्त केले.💐💐💐💐💐

Post a Comment

0 Comments