Header Ads Widget

*भडणे येथे विधी सेवा समिती अंतर्गत कायदेविषयक जनजागृती अभियान कार्यक्रम*



        शिंदखेडा ( यादवराव सावंत ) प्रतिनिधी --
 तालुक्यातील भडणे येथे तालुका विधी सेवा समिती व वकील संघ शिंदखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाद्वारे नागरिकांचे सशक्तीकरण व संपर्क अभियान दिनांक 31 सप्टेंबर ते १३ नोव्हेंबर पर्यंत भारत सरकार कायदेविषयक जनजागृती अभियान निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
 येथील ग्रामपंचायत कार्यालयात सायंकाळी सहा वाजता कायदेशीर शिबिर संपन्न झाले. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  ए. बी. तहसीलदार दिवाणी न्यायाधीश शिंदखेडा, उपस्थित होते . प्रसंगी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून अँड. विजय पवार अध्यक्ष वकील संघ शिंदखेडा, अँड. बी.झेड. मराठे उपाध्यक्ष वकील संघ शिंदखेडा उपस्थित होते. यावेळी मान्यवराचा भडणे लोकनियुक्त सरपंच गिरीश पाटील यांनी सत्कार केला.त्याचप्रमाणे अँड. सी. आर. बैसाणे, बी.झेड. मराठे, अँड. वसंतराव पवार, अँड. शहाबाज शेख यांनी नागरिकांना कायदेविषयक माहिती दिली यात बालविवाह, तसेच विविध कायदेविषयक माहिती नागरिकांना यावेळी देण्यात आली, यावेळी दिवाणी न्यायाधीश ए.बी. तहसीलदार 
यांनी नागरिकांना कायदे विषयी माहिती देताना गावातील छोटे-मोठे तंटे आपसात मिटून, गावातील शांतता आबादीत ठेवा, छोट्या मोठ्या विवादातून गावातील तंटे आपसात मिटवण्यासाठी ग्राम स्तरावर प्रयत्न करा, कायद्याचे नियमांचे  तंतोतंत पालन करा, आपले गाव तंटामुक्त करण्यासाठी गावकऱ्यांनी  एकोपा टिकून ठेवा वाद विवाद टाळा  इतरांचे आपुलकीने वागा नागरिकांनी कायदेविषयक माहिती दिली व मार्गदर्शन याप्रसंगी नागरिकांना केले.  सूत्रसंचालन सतीश बागुल, पी. एस. पवार यांनी केले . लोकनियुक्त सरपंच गिरीश पाटील ,भडणे येथील आदर्श पोलीस पाटील युवराज माळी, उपसरपंच जगतसिंग गिरासे, अशोक माळी, विठोबा पाटील, बाळासाहेब पाटील, गोरख पाटील, शिंदखेडा वकील संघाचे अँड. प्रशांत जाधव, अँड. हर्षल अहिरराव, अँड. निलेश पवार, अँड. सोनवणे, अँड. प्रमोद परदेशी, अँड. जोत्सना पारधी, अँड. अनिता पाटील, अँड. आर.सी. खैरनार, अँड. संकेत मराठे, अँड. जोत्सना पाटील, अँड. सी,एस. वाघ, अँड. शहबाज शेख  मान्यवर  उपस्थित होते. तर शिबिरासाठी मोठ्या संख्येने महिला सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments