*इरशाद भाई जहागीरदार यांचे कार्य कौतुकास्पद..! भाईजी नगरच्या रहिवाश्यांनी सत्कार करत केले कौतुक..!*
(धुळे दि. ०६-११-२०२२) धुळे शहरात सध्या नागरिकांनी केलेल्या मागणी नुसार आणि महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस असलेले अजित दादा पवार यांचे विश्वासू व निकटवर्तीय सहकारी असलेले मा. श्री. इरशाद भाई जहागीरदार यांच्या स्वतःच्या निधीतून विविध ठिकाणी बोअरिंगचे उद्घाटन होत आहे. याच पार्श्वभमीवर आज तुलसी विवाह आणि रविवारचे औचित्य साधून धुळे शहरातील मिल परिसर येथे भाईजी नगर मध्ये आपल्या स्वतःच्या निधीतून मा. श्री. इरशाद भाई जहागीरदार यांनी बोअरिंगचे उद्घाटन केले. यावेळी निलेश काटे यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की इरशाद भाई जहागीरदार यांनी धुळे शहरातील मोगलाई येथे हनुमान मंदिराजवळ बोअरिंग केली आणि इथल्या बोअरिंगचे पाणी हनुमान मंदिर आणि बाजूला असलेल्या मशिदीमध्ये भाविकांसाठी वापरले जात आहे. हा इरशाद भाई जहागीरदार यांनी धुळे जिल्ह्याला दिलेला राष्ट्रीय एकात्मतेचा एक अनोखा असा संदेश आहे. आम्ही आमच्या भाईजी नगरच्या नागरिकांच्या वतीने त्यांचे खूप आभार मानतो असे सांगितले.
या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस मा. श्री. इरशाद भाई जहागीरदार यांच्यासह माजी नगरसेवक नवाब दादा बेग, प्रमोद अण्णा साळुंखे, निलेश काटे, मुकेश सोनार, भूषण ठाकरे, माणिकराव पानगव्हाणे, राहुल काटे, अर्जुन पाटील, कपिल शर्मा, कृष्णकांत वाडीले, सौ. लीना काटे, सौ. वैशाली शिरुडकर, सौ. जयश्री सोनार, विकी ठाकरे, मनोज शर्मा, सौ. शैला काटे, दिलीप अग्रवाल, सौ. निमाताई काकड, आशिष अग्रवाल, ॲड. ज्योती अग्रवाल, बलदेव शर्मा यांच्यासह भाईजी नगरचे रहिवासी नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.


0 Comments