शिवारात असलेल्या हाँटेल आशिर्वाद समोर झाला. त्यामुळे बराच काळ वाहतूक ठप्प झाली होती. अपघातातील मृत रामकृष्ण पाटील व भुषण शिंदे हे सोनगीर येथे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी गेले होते. तेथुन परत येत असताना भुषण हा दुचाकी चालवत होता. तर कृषी विभागाचे अधिकारी बोगस बियाण्यासंदर्भात कारवाई करण्यासाठी गेले असल्याची माहिती मिळाली. भुषण शिंदे व रामकृष्ण पाटील हे दुचाकीवरून सोनगीर कडुन चिमठाणेकडे एम एच -४१ पी - ३९६५ ने येत असताना चिमठाण्याकडुन सोनगीर च्या दिशेने जाणाऱ्या बोलेरो एम एच -१८ बीसी -७८७४ वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यामुळे दुचाकी २० फुट अंतरावर रस्त्यापलिकडील शेतात फेकली गेली. यामुळे दुचाकीवरील दोन्ही जण जागीच गतप्राण झाले. हा अपघात सोनगीर ते चिमठाणे दरम्यान असलेल्या सोंडले गावाजवळील हाँटेल आशिर्वाद समोर घडला. अपघाताची माहिती मिळताच शिंदखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील भाबड घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील मृतांना शिंदखेडा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातामुळे वाहतुकीची कोंडी झाल्याने ट्रेनच्या साहाय्याने वाहनं उचलून सोनगीर पोलीस स्टेशनला लावण्यात आली. त्यानंतर वाहतूक सुरळीत चालू झाली. कृषी विभागाचे वाहन चालक प्रमोद रमेश धनगर (३७ ) हे रात्री उशिरापर्यंत सोनगीर पोलीस स्टेशनला थांबले होते. रात्री उशिरापर्यंत अपघाताची नोंद करण्याचे काम सुरू होते.
0 Comments