Header Ads Widget

*शिंदखेडा तालुका अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटनेच्या वतीने पोलीस कर्मचाऱ्यांना अर्जित रजा रोखीने व सातव्या वेतन आयोगाप्रमाणे द्या यासाठी तहसीलदार यांना निवेदन*




                    शिंदखेडा ( यादवराव सावंत ) प्रतिनिधी --अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटना शिंदखेडा यांच्यातर्फे आज नायब तहसीलदार बन्सीलाल वाडीले  यांना पोलीस कर्मचारी बांधवांना अर्जित रजा रोखीने व सातव्या वेतन आयोग प्रमाणे देण्यात यावे यासंदर्भात मा. मुख्यमंत्री साहेब व तथा मा.गृहमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य मंत्रालय तहसीलदार यांच्यातर्फे निवेदन देण्यात आले. निवेदनाद्वारे म्हटले आहे की, महाराष्ट्र  पोलीस विभागाला सातवा वेतन आयोग सन २०१६ पासून लागू करण्यात आला असून त्याप्रमाणे वेतन चालू आहे, परंतु २०१६ पासून अद्याप पावेतो अर्जीत रजा रोखीकरण सातव्या वेतन आयोगाप्रमाणे  देण्यात आलेले नाही. आठ वर्षांच्या कालावधी लोटल्यानंतरही रजा रोखीकरण सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे देण्यात येत आहे. ही बाब पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारी आहे. हा अन्याय दूर करण्यासाठी लवकरात लवकर सातव्या वेतन आयोगाप्रमाणे रजा रोखीकरण देण्यात यावे तसेच थकबाकी देखील देण्यात यावी. तसे न झाल्यास अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटनेच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा यानिमित्ताने देण्यात आला आहे. निवेदन देण्यासाठी उपस्थित पदाधिकारी मध्ये जितेंद्र राजपूत शिंदखेडा तालुकाध्यक्ष, हेमंत चित्ते  तालुका उपाध्यक्ष, ज्ञानेश्वर माळी  तालुका सचिव, योगेश गोसावी  तालुका सहसचिव, मुकेश वाघ तालुका कोषाध्यक्ष, सचिन पाटील  तालुका सहकोषाध्यक्ष, भूषण पवार तालुका संघटक, यादवराव सावंत  तालुका प्रसिद्धप्रमुख, शोभा पाटील,  तालुका महिला अध्यक्ष, रीना वाघ तालुका महिला उपाध्यक्ष रितांजली गिरासे तालुका महिला सचिव, संगीताताई गिरासे  तालुका प्रसिद्धीप्रमुख, सुवर्णा गोसावी  तालुका महिला संघटक त्याचप्रमाणे संस्थापक अध्यक्ष मा.श्रीनिवास इंदुरकर व धुळे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाने हे निवेदन देण्यात आले.

Post a Comment

0 Comments