Header Ads Widget

*शिंदखेडा काँग्रेस कमिटीच्या शहराध्यक्षपदी दिनेश माळी यांची निवड.- प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रदान केले नियुक्तीपत्र*




             शिंदखेडा ( यादवराव सावंत ) प्रतिनिधी-- शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्षपदी दिनेश आत्माराम माळी यांची  नियुक्ती करण्यात आली .महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्यालय दादर येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार नानासाहेब पटोले यांच्या शुभहस्ते नियुक्ती पत्राचे वितरण करण्यात आले यावेळी धुळे जिल्ह्याच्या 


प्रभारी डॉक्टर शोभाताई बच्छाव धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, सिंदखेडा नगरीचे माजी विरोधी पक्ष नेते सुनील चौधरी, माजी नगरसेवक दीपक अहिरे, कैलास वाघ बाल मुकुंद सत्ताळीस  आदी पदाधिकारी यावेळेस उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी शिंदखेडा शहरांमध्ये काँग्रेसची मजबूत बांधणी करावी ,मी आगामी काळात दौरा करणार आहे त्यावेळेस सर्व कार्यकर्त्यांशी संवाद साधून पक्ष बांधणीच्या कामातील आपला आढावा नक्की घेईल अशा आशयाच्या भावना व्यक्त करून त्यांना नवीन नियुक्ती बद्दल शुभेच्छा दिल्यात. सदरील निवडीबद्दल शिंदखेडा शहरातुन सर्वत्र स्तरावरून अभिनंदन केले जात आहे.

Post a Comment

0 Comments