आयोजित करण्यात आला. सुरुवातीला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष तथा तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव कदम व उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष नाना बच्छाव यांच्या नेतृत्वाखाली धुळे व नंदुरबार जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील आणि महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा किरण बच्छाव यांनी धुळे व नंदुरबार जिल्ह्यासह शिंदखेडा मतदारसंघात प्रचार प्रसार दौरा करून महाराष्ट्र राज्यातील सर्व जागांवर भारत राष्ट्र किसान समितीचे सर्वमान्य उमेदवार रिंगणात उतरविले जाणार आहेत त्या माध्यमातून शिंदखेडा शहरातुन सुरुवात करण्यात आली. ह्यावेळी शहरप्रमुख अजय पानपाटील सह शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तेलंगणा राज्याच्या विकासकांना डोळ्यासमोर ठेवून शेतकरी हितावह महाराष्ट्र राज्यात देखील भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष तथा मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रकारच्या योजना प्रभावीपणे अंमलबजावणी केली जाईल. येणाऱ्या शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीत देखील स्वतंत्र पॅनल उभे करून सर्वसामान्य उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार तसेच शिंदखेडा मतदारसंघासह संपूर्ण महाराष्ट्रात २८८ जागांवर भारत राष्ट्र किसान समितीचे उमेदवार रिंगणात उतरविले जाणार आहेत म्हणून पक्ष बडकटीसाठी संघटन आणि मजबुती साठी शिंदखेडा शहरापासून प्रचार दौरा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून सुरुवात करीत असल्याचे धुळे व नंदुरबार जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील यांनी यावेळी सांगितले.
0 Comments