Header Ads Widget

*वाडी- शेवाळे प्रकल्पातुन आवर्तन सोडले- बुराई नदी काठावरील २५ गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार - आमदार जयकुमार रावल यांनी केली होती मागणी*




 शिंदखेडा ( यादवराव सावंत ) प्रतिनिधी --.  आमदार तथा माजी मंत्री जयकुमार रावल यांच्या पाठपुराव्या नुसार वाडी शेवाडे धरणातून सुमारे 25 गावांना पिण्यासाठी बुराई नदीत नुकतेच धुळे जिल्हा भाजपाचे अध्यक्ष श्री.नारायण पाटील यांच्या हस्ते पाणी सोडण्यात आले. सदर पाणी हे बुराई नदीच्या काठावरील शेवाडे ते सुलवाडे पर्यंत सर्व गावांना या पाण्याचा पिण्यासाठी उपयोग होणार आहे. सदर गावांना या महिन्यात पाण्याची टंचाई जाणवत होती म्हणून या तालुक्याचे आमदार श्री.जयकुमार रावल यांनी जिल्हाधिकारी धुळे यांच्याकडे आवर्तन सोडण्याबाबत मागणी केली होती. वाडी- शेवाडे धरणांच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले. सदर पाण्याचा देगाव,शेवाडे,आरावे, चीमठाणा, दरखेडा, बाभूलदे,निसाणे,महाळपूर, चिरणे, कदाने, अलाने ई,या गावांच्या शेतीला कापूस लागवडीसाठी व पिणाच्या पाण्यासाठी फायदा होणार आहे.याप्रसंगी पंचायत समितीचे उपसभापती रणजीतसिंग गिरासे,पंचायत समिती सदस्य दीपक मोरे, पंचायत समिती सदस्य रणजीतसिंग गिरासे, दोंडाईचा मार्केट कमिटीचे संचालक डॉक्टर दीपक बोरसे, संचालक दगेसिंग गिरासे,धुळे पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता आर.जे.खैरनार, शेवाडे सरपंच पांडू मोरे, माजी सरपंच बबलू कोळी, ग्रामपंचायत सदस्य भैय्या माळी, नानाभाऊ कोळी, अर्जुन कोळी, रतिलाल कोळी,आरावे उपसरपंच नवल गिरासे,पोलीस पाटील अशोक भील, ग्रामपंचायत सदस्य जयसिंग भिल, हरेश धनगर, गोरख ठेलारी, देगावचे पिंटू पाटील, तसेच शेवाडे, आरावे, देगाव,अमराळे येथील ग्रामस्थ,शेतकरी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments