Header Ads Widget

*शिंदखेडा येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर कारवाई निःपक्षपाती पणे व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी चे तहसीलदार यांना निवेदन*




शिंदखेडा ( यादवराव सावंत )- प्रतिनिधी :-                             केंद्र व राज्य सरकार ED ला हाताशी धरून जाणीवपुर्ण या राज्यातील राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या नेत्यांवर ज्या पद्धतीने सुड बुद्धीने कार्यवाही सुरू केली आहे सदरच्या कार्यवाही मध्ये काही तथ्य नसुन सुडाचे राजकारण या माध्यमातुन चालु असुन आमच्या नेत्यांची बदनामी करण्याचे मोठे कारस्थान सुरू आहे  सदरची कार्यवाही ED सुड बुद्धीने व कोणाच्याही सांगण्यावरून न करता ती निपक्षपातीपने व्हावी व आमच्या नेत्यांची प्रतीम मलिन करू नये अशा आशयाचे निवेदन शिंदखेडा नायब तहसीलदार बन्सीलाल वाडीले यांना सादर  करण्यात आले.हयावेळी  शिंदखेडा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष  प्रवीण पाटील, शिंदखेडा तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष  मिलिंद देसले, शिंदखेडा तालुका शहर अध्यक्ष राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष प्रशांत पाटील उर्फ गोलू दादा,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे रहीम खाटीक, देविदास बागल, रोहित जाधव, महेश पाटील,चेतन देसले, अँड.निलेश देसले सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments