शिंदखेडा ( यादवराव सावंत ) प्रतिनिधी - धुळे तालुक्यातील सोनगीर येथील एन जी बागुल हायस्कूल मध्ये विविध पदांसाठी बनावट आॅर्डर तयार करून नोकरी लावून देण्याच्या नावाखाली सुमारे ३३ लाख ५० हजारांवर गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला असून संस्थाध्यक्ष यांच्या विरोधात सोनगीर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात शिंदखेडा येथील मुळ रहिवासी शहादा येथील सत्यनारायण पांडुरंग शिंपी यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सोनगीर येथील एन जी बागुल हायस्कूल मध्ये लिपीक, लॅब असिस्टंट, उपशिक्षक, अशा वेगवेगळ्या पदांची नियुक्ती साठी सुनील ऊर्फ भेरुलाल हिरालाल बागुल रा सोनगीर यांनी स्वतः संस्थेचे अध्यक्ष असल्याचे सांगुन बनावट आॅर्डरी तयार केल्या. आणि सत्यनारायण शिंपी यांचे भाऊ हनुमंत पांडुरंग शिंपी व बहिण सुवर्णलता पांडुरंग शिंपी यांच्या सह इतरांना नोकरी च्या नावाने आॅर्डरी दिल्या शिंपी यांच्या कडून ४ लाख ५० हजार रुपये रोख घेतले होते. मात्र सुनील बागुल यांनी कोणतीही नोकरी न लावता शिंपी यांच्या सह इतरांकडून सुमारे ३३ लाख ५० हजार रुपयांहून अधिक फसवणूक केली आहे. सदर सदर सन -२००८ ते सन -२०१७ मध्ये हा प्रकार घडला आहे. यावरून सुनील बागुल यांच्या विरोधात सोनगीर पोलीस स्टेशनला भादवि कलम ४२०,४६५, ४६८,४७१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकार शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारा आहे. असे अनेक प्रकार इतर संस्थांच्या माध्यमातून देखील सुरू आहेत मात्र त्यांच्या विरोधात आवाज उठवला जात नाही. म्हणून असे संस्था चालक फोफावले आहेत. अशावर कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. जेणेकरून अशा शिक्षण सारख्या पवित्र क्षेत्रात बनावट आॅर्डरी तयार करून नोकरी लावून देण्याचा नावाने सुशिक्षित बेरोजगारांची फसवणूक केली जाणार नाही. अशावंर वरीष्ठ अधिकारी व राजकीय नेत्यांचा वरदहस्त असल्याने हे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. हे कुठेतरी थांबायला हवे.
0 Comments