Header Ads Widget

*भाजपा निमंत्रित सदस्य म्हणून होळ येथील महेंद्र खैरनार यांची निवड*

    

    शिंदखेडा ( यादवराव सावंत ) प्रतिनिधी-- तालुक्यातील होळ येथील सर्व सामान्य कुटुंबातील भाजपा शी गेल्या पंधरा वर्षांपासून एकनिष्ठ कार्यकर्ते राहिलेले महेंद्र महादु खैरनार यांची भाजपा निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. शिंदखेडा तालुक्यातील होळ येथील सर्व सामान्य कुटुंबातील भाजपा शी गेल्या पंधरा वर्षांपासून एकनिष्ठ राहून पक्ष बडकटीसाठी प्रचार प्रसार करित आहेत. त्याची हयाआधीचा प्रवास होळ ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सहकारी सोसायटी च्या संचालक तसेच अनु. जाती मोर्चा चे जिल्हाध्यक्ष पद भूषविले आहे तर त्यांना बळती देऊन भाजपा अनु जाती मोर्चा चे प्रदेश सचिव पदावर कार्यरत होते. त्यांची पक्षांशी एकनिष्ठता पाहून महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीच निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती केल्याचे पत्र दिले आहे. सदरील निवडीबद्दल शिंदखेडा तालुक्यातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते आणि मित्र परिवारातर्फे सर्वत्र स्तरावरून अभिनंदन केले जात आहे.

Post a Comment

0 Comments