पालकांनो वेळीच दक्षता घ्या.किती शालेय विद्यार्थींची वाहतूक करणाऱ्या चालक किंवा मालक Regional transport office ( RTO) च्या नियमाप्रमाणे विद्यार्थ्यांची ने - आण करतात स्कूल बस किंवा शालेय विद्यार्थी वाहतुक वाहनं अशी हवी
• प्रथमोपचार साहित्य व औषधे उपलब्ध असावीत.
• अधिकृत संस्थेची प्रमाणित ५ किलोग्रॅम वजनाचे दोन अग्निशमन यंत्रे (एक चालक कक्षात व दुसरे संकटसमयी बाहेर पडावयाच्या मार्गाजवळ) बसवणे बंधनकारक आहे.
• बसच्या खिडक्यांना तीन आडव्या दांड्या
असाव्यात. दोन दांड्यांमधील अंतर ५ सेमीपेक्षा अधिक असू नये.
• बसची सर्व आसने समोरील बाजू असावीत, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही.
• शालेय बसवर कोणतीही व्यावसायिक जाहिरात नसावी.
• चालकास ५ वर्षे वाहन चालविण्याचा अनुभव बंधनकारक; वाहतुकीच्या कोणत्याही गुन्ह्यात त्यास दंड झालेला नसावा. वाहतुकीचा परवाना, बिल्ला त्याच्याकडे हवाच.
• थांब्यावर विद्यार्थी घेवुन जाण्यासाठी अधिकृत व्यक्ती हजर नसल्यास संबधीतांना संपर्क करुन विद्यार्थीस सोपवावे किंवा विद्यार्थ्यास शाळेत परत आणावे आणि पालकांना बोलावून त्यांच्याकडे सोपवावे.
• स्कूल बसची यांत्रिक स्थिती उत्तम असावी. आरटीओकडील फिटनेस (योग्यता) प्रमाणपत्र त्यांच्याकडे बंधनकारक आहे.
• स्कूल बस पिवळ्या रंगाच्या असतील, तसेच बसेसच्या पुढे व मागे SCHOOL BUS असे ठळक अक्षरात लिहिलेले असावे
• स्कूलबस नोंदणीपासून १५ ते २० वर्षांपेक्षा अधिक जुनी नसावी.
• शाळेचे नाव, मार्ग क्रमांक लिहिलेले दोन फलक आवश्यक आहे. हा फलक समोरील बाजूच्या डाव्या बाजूला खिडकीजवळ असावा.
• बसमध्ये निर्धारित क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी नसावेत; प्रत्येक बसमध्ये सुरक्षा दांडे, हाताने धरावयाचे कठडे, संकटसमयी बाहेर पडण्याचा मार्ग, प्रथमोपचार संच, अग्निशमन यंत्र गरजेचे आहे.
• शाळेच्या वाहतुकीसंदर्भातील प्रश्न सोडवण्यासाठी एक वेगळी समिती असावी. या समितीत शाळेचे मुख्याध्यापक, पोलीस अधिकारी, मोटार वाहन निरीक्षक, शिक्षणाधिकारी आणि इतर आधिकारिक मंडळी असावीत.
• शालेय विद्यार्थी वाहतुक करणाऱ्या वाहनाचा नियमाप्रमाणे विमा असणं अत्यावश्यक. वरीलपैकी तीन ते चार वाहन बेकायदेशीर रित्या रोटरी इंग्लिश स्कूल येथे चालवल्या जात आहेत निश्चित याला संस्थेच्या वरिष्ठांचे पाठबळ आहे.पालकांनो वेळीच सावधान व्हा आणि संस्थेच्या चेअरमनला जाब विचारा..वाहक चालक शे दोनशे रुपये कमी घेत असतील तर आपल्या मुलांच्या जीवाशी खेळू नका. त्या तीन ते चार वाहनाचे सध्याचे अपडेट मागवले आहेत ते बघा आणि विचार करा किती निर्लज्ज असतील संस्थेचे वरिष्ठ मंडळी मागे हिच बातमी लावण्यात आली होती तरीही अहंकाराने व राजकाऱ्यांना हाताशी धरून हे शिक्षणसम्राट डोळेझाक करतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिका संघटित व्हा असा उपदेश दिला पण आज शिक्षणाचा बाजार मांडला आहे या शिक्षीत पैसे वाल्यांनी तुर्तास एवढेच बाकी आपण सुज्ञ आहात 🙏.
*आण्णा कोळी महादेवपुरा दोंडाईचा*
0 Comments