Header Ads Widget

*राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग धुळे ग्रामीण जिल्हाध्यक्ष हर्षदीप वेंदे यांची नियुक्ती*




मुंबई : आज मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश कार्यालय मध्ये राज्याचे  उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार साहेब यांच्या शुभ हस्ते राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग धुळे ग्रामीण जिल्हाध्यक्ष  हर्षदीप वेंदे शिंदखेडा यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
      यावेळी कॅबिनेट क्रीडामंत्री  संजय बनसोडे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत व सामाजिक न्याय विभाग प्रदेशाध्यक्ष प्रा. सुनिल मगरे साहेब यांच्या मान्यतेने व मार्गदर्शनाखाली पद देण्यात आले. या प्रसंगी
सामाजिक न्याय विभाग  माजी धुळे जिल्हाध्यक्ष महेंद्र दादा शिरसाठ उपस्थित होते.
    तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी धुळे जिल्हा जेष्ठ नेते ज्ञानेश्वर भामरे यांच्या शिफारस पत्र म्हणून देण्यात आले. आणि माजी कामगार मंत्री तथा ज्येष्ठ नेते मा. हेमंतराव देशमुख , माजी म्हाडा सभापती .किरण नाना शिंदे माजी . जिल्हा अध्यक्ष सुरेश सोनवणे माजी आमदार रामकृष्ण पाटील व जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी ग्रंथालय विभाग दीपकराव जगताप   यांनी सहकार्य व अभिनंदन केले. 
       धुळे जिल्हातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments