दि.१९:-भारत शासना तर्फे सांगण्यात आलेला एक आदर्श कार्यक्रम 'मेरी माटी, मेरा देश' या कार्यक्रमाचा सांगता सोहळा महानगरपालिकेने उत्तमराव पाटील उद्यानासमोर नुकताच साजरा झाला.
या कार्यक्रमात कमलाबाई शंकरलाल कन्या शाळेच्या विद्यार्थिनींनी 'मेरी माटी मेरा देश' या विषयाचे पथनाट्य सादर केले.
उपस्थित मान्यवरांना हे पथनाट्य खूप भावले. जिल्हाधिकारी श्री.गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गुप्ता, आयुक्त साहेब सर्वांनी विद्यार्थिनी व शिक्षकांचे भरभरून कौतुक केले. महापौर सौ प्रतिभाताई चौधरी यांनी विद्यार्थिनी सोबत मेरे देश की धरती या गाण्यात सुरात सूर मिसळला.शिक्षणाधिकारी श्री. मोहन देसले साहेब यांनी विद्यार्थिनी व कलाशिक्षक केदार नाईक यांचे बक्षीस देऊन कौतुक केले. यात परदेशात जाणारे हुशार विद्यार्थ्यांना आपल्या भारताची, भारतातल्या मातीची, आठवण करून देणाऱ्या वाक्यांनी प्रेक्षकांची दाद मिळवली. देशाप्रती असलेला अभिमान,माती प्रती असलेली श्रद्धा, क्रांतिकारकांनी केलेला त्याग आणि आपल्याला निर्माण करायचा असलेला आत्मनिर्भर भारत अशा विविध मुद्द्यांना स्पर्श करणाऱ्या पथनाट्याने उपस्थित यांना भारावून टाकले.या पथनाट्याचे लेखन व दिग्दर्शन कमलाबाई शाळेतील कलाशिक्षक केदार नाईक यांनी केले. नाट्यातील गाण्याला ढोलकीची साथ श्री.प्रतीक घोलप यांनी दिली व संवादिनीची साथ सौ.वर्षा जोशी यांनी दिली
या पथनाट्यात निकिता पाटील, आदिती वायकर, दीक्षा भालेराव, दक्षता पाटील ,कोमल महाजन, शुभेच्छा सोनवणे, जिग्नेश्या मासुळे,अनन्या जैन, भार्गवी चव्हाण, श्रेया पाटील, प्रज्ञा दुसाने, श्रावणी बाविस्कर, लावण्या ठाकूर या इयत्ता आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. जगदीश देवपूरकर ,वाईद अली, अनिल साळुंखे या आणि अशा अनेक मान्यवरांनी विद्यार्थिनी व शिक्षकांचे स्वतः भेटूनकौतुक केले.उपस्थितांनी भरभरून दाद दिली.
0 Comments