Header Ads Widget

*उपजिल्हा रुग्णालयाच्या कर्मचारी वर्गात "चहा पेक्षा केटली गरम"✍️✍️✍️



दोंडाईचा-- मराठीत एक म्हण आहे सरकारी काम करतांना अनेकांना आलेला अनुभव म्हणजे "चहा पेक्षा केटली गरम असते हा अनुभव उपजिल्हा रुग्णालयात पण येतो. उपजिल्हा रुग्णालयाचा भोंगळ कार्यभार अनेकदा समोर आला आहे सरकारी रुग्णालय म्हणजे गोरगरिबांना मोफत उपचार मिळण्याचे हक्काचे ठिकाण परंतु त्याच सरकारी रुग्णालयात माणुसकी शुन्य संवेदना असलेले कर्मचाऱ्यांची कमी नाही. उपजिल्हा रुग्णालयात गरिबांच्या उपचारासाठी १२ बेड असलेले ३ वार्ड आहेत या ३ ही वार्डात रुग्ण अॅडमिट असतात डाॅक्टरांनी हात न लावता रुग्ण तपासणी करुन वार्डात अॅडमिट केले तरी त्याठिकाणी असलेल्या परिचारिकेंना हात लावण्या शिवाय पर्याय नाही. परंतु याठिकाणी असलेल्या परिचारिका वार्ड नंबर २ च्या गेट जवळ टेबल घेऊन बसतात आधीच परिचारिकेंची संख्या कमी त्यात कामाचा ताण असल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांकडूनच काम करुन घेतात अर्थात सलाईन घेऊन या सलाईनचे स्टॅड घेऊन या असे काम पावर मध्ये करुन घेतात. रुग्णालयात वार्ड क्रमांक १ आणि ३ मध्ये असलेले रुग्ण रामभरोसे असतात कारण त्याठिकाणी परिचारिका राहत नाही. परिचारिकेला त्या वार्डात कामकाज दिले असते परंतु  गप्पा गोष्टी मारण्यासाठी एकाच टेबलावर काम करतात या सवयीमुळे वार्ड क्रमांक १ आणि ३ मध्ये अॅडमिट असलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांना त्रास दिला जातो.  सलाईन संपली किंवा आऊट झाली तर परिचारिकेंना बोलवण्यासाठी जावे लागते बोलवून हि वेळेवर येत नाही. तर कधी -कधी लावलेल्या सलाईन संपल्यामुळे हातातून रक्त सलाईन मध्ये जाते तरी परिचारिका वेळेवर पोहचत नाही. अशी परिस्थिती आहे वास्तविक पाहता वार्ड १ आणि ३ याठिकाणी परिचारिका थांबणे बंधनकारक आहे तशी व्यवस्था आणि औषध उपचाराचे साधन आहे तरी या वार्डात कधीही नर्स थांबत नाही वार्ड क्रमांक ३ तर महिला उपचारांचा वार्ड आहे तरी याठिकाणी नर्स थांबत नाही उपजिल्हा रुग्णालयात फक्त ३ वार्ड असले तरी ३ नर्स नसतील का? परंतु रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना त्रास कसा होईल यासाठी प्रयत्न केला जातो का? अशी शंका येते कारण सर्व साधन सामुग्री असुन योग्य उपचार मिळत नाही त्यात डाॅक्टर हात लावत नाही तर परिचारिका नातेवाईकांकडून काम करुन घेते कारण एकाच वार्डात थांबून इतर २ वार्डाचे काम पाहतात या असे प्रकार बंद झाले पाहिजे यासाठी वैद्यकीय अधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सक अधिकारी लक्ष देतील का? रुग्णांच्या नातेवाईकांना होणारा त्रास थांबणार कधी .......

अहिल्या न्यूज मिडिया*साभार 

Post a Comment

0 Comments