शिंदखेडा तालुक्यातील शिंदखेडा शहरापासून अवघ्या पाच किमी अंतरावर असणाऱ्या निरघुडी शिवारात बिबट्याचा प्रवेश झाला असून जनगलातील शेतकरी मालकीची दोन वासरे व दोन शेळ्यावर त्याने हल्ला केल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे
दोन दिवसापूर्वी तापीकाठावरील सुकवद परिसरात त्याने आपले अस्तित्व निर्माण केले होतें तर आज सुकवड शिवाराला लागून निरघुडी शिवराकडे आपला मोर्चा वळवला आहे येथील शेतकरी कमलसिंग बुवाभाई गिरासे यांच्या मालकीचे दोन वासरे यांची शिकार त्याने केली आहे तर मीराबाई राजेंद्र ठाकरे यांच्या मालकीच्या दोन शेळ्यांवरही हल्ला करून जखमी केले आहे परिसरात शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तर भयभीत शेतकऱ्यांनी वन विभागाकडे तक्रार करून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे आज दिवस भर शेतकरी गावकरी बिबट्याचा माग काढत शोध घेत असल्याचे समजते
0 Comments