*शिंदखेडा-- .*शहर काँग्रेस तर्फे स्व. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली. सध्याच्या* *भारतीय राजकारणात बघितले असता सध्या परिस्थिती ही अत्यंत भयावह असून संविधानाला पूरक असं वातावरण सध्या स्थितीत देशामध्ये नाहीये लोकाभिमुख सरकार असायला हवं पण सत्ताधारी त्यात कुठेतरी कमी पडत आहेत अशी भावना जनमानसात तयार झालेली आहे. देशाला विकासाकडे नेण्याचे सोडून देश भलत्याच दिशेने वाटचाल करत आहे मणिपूर सारखी भयानक घटना सध्या स्थितीत देशांमध्ये घडत आहे. स्वर्गीय राजीव गांधी नंतर इंदिरा गांधी व सोनिया गांधी यांनी चालवलेल्या काँग्रेसच्या काळात देशातील गोरगरीब,दिन,दुबळे वंचितांना,शोषितांना,कॉंग्रेस सरकारच्या काळात सर्वांना समानतेची वागणूक मिळत होती जातीय धर्म भेदभाव कुठेतरी बळवला गेला नाही त्याच विचारांचा वसा आणि वारसा इथून पुढे आपणा सर्वांना रुजवण्याचा काम स्वर्गीय राजीव गांधींच्या जयंतीनिमित्ताने श्री जी शोरूमचे मालक आदरणीय भाऊसाहेब सुनील जी चौधरी यांनी आयोजित केलेल्या आदरांजलीच्या कार्यक्रमात आमदार कूणाल पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले.यानिमित्ताने जिल्हाध्यक्ष . शामकांत सनेर. प.स. माजी सभापती सुरेश देसले ,माजी विरोधी पक्षनेते नेते सूनिल चौधरी यांचे हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. याच वेळी राष्ट्रवादी कॉग्रेस च्या लिगल सेल चे राज्य कार्यकारीणी सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल ऐड.निलेश देसले यांचा आमदार पाटील यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.या वेळी नगरसेवक..दिपक आहिरे. प स सदस्य ् राजेंद्र देवरे. शहर अध्यक्ष दिनेश माळी.युवक तालुका अध्यक्ष सोनु झालसे.नगरसेवक .सुभाष देसले. हाजी शब्बिर पठाण.गोटू ठाकुर. वेडू माळी. चंद्रशेखर चौधरी. परिक्षीत देशमुख. प्रमोद पवार. समद शेख. निमण पठाण.. हमीद पठाण,राकेश पवार, तन्वीर मिर्झा,महेश चौधरी आदी उपस्थित होते. ऐड.देसले यांनी उपस्थितांचे आभार मानले.*
0 Comments