Header Ads Widget

मोगलाई युनिट विज वितरण कंपनीने आपली जबाबदारी पार पाडली संबंधितांचे ‘जरतारी’ आभार मानत पत्रकार गो.पि. लांडगे यांचे उपोषण तहकुब




  धुळे - ‘साक्री रोड मोगलाई विज वितरण कंपनीचे पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या’ या शिर्षकाखाली गेल्या आठवड्यात आपण समाज माध्यम वृत्तपत्रातून बेमुदत उपोषणाचा इशारा दिला होता. विज वितरण कंपनी मोगलाई युनिटच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी काल तातडीने दखल घेऊन मलेरिया ऑफिस मागील सप्तश्रृंगी मंदीर लगतच्या वारंवार तुटणाऱ्या, लोंबळकणाऱ्या विद्युत तारांचे स्टेंगीग करून दहा बारटीम ओढले व झाडांच्या फांद्यांची छाटणी करून विद्युततारांचे काम धोकाविरहीत केले म्हणून ज्येष्ठ पत्रकार गो.पि. लांडगे  यांनी मोगलाई युनिट कर्मचाऱ्यांचे ‘जरतारी’ आभार मानून बेमुदत उपोषणाचा निर्णय तहकुब केला. 
गो. पि. लांडगे यांनी आपल्या पत्रकात म्हटले आहे की, मोगलाई युनिट विज वितरण कंपनीच्या अभियंता फुलपगारे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कंपनीचे ठेकेदार तुषार वराडे, पिराजी आप्पा गवळी, सुरेश वायरमन, भुषण तांबे, धुळे जिल्हा लाईनमन राजेंद्र सोनवणे आदींनी काल सुरळीत तार जोडणीची कामगिरी केली व परिसरात एक पोलही बसविला याची आपण खात्री केली व मंदीराचे भयभित झालेले पुजारी लोणारी परिवार यांचे योग्य काम झाल्याबद्दल समाधान झाल्याने आपण उपोषणाचा निर्णय तहकुब केला. वेळोवेळी लोंबकळणाऱ्या व खाली पडणाऱ्या तारांमुळे सप्तश्रृंगी मंदीर परिसरातील भाविक, वाटसरु एव्हढे भयभित होत असत की, वेळोवेळी दिसणाऱ्या सर्पांपेक्षा पडणाऱ्या विद्युत तारांची खात्री करून वाटचाल करावी लागे. कारण सरपटणाऱ्या प्राण्यांच्या दंशावर औषध आहे. विद्युत तारांच्या स्पर्शावर नाही. मंदीराचे पुजारी लोणारी परिवार त्यामुळे सतत भयाच्या वातावरणात वावरत असत. त्यांना मंदीरात येणाऱ्या भाविकांची काळजी असे. विजवितरण कंपनी आणि महापालिकेचा विद्युत विभाग यांचा एकमेकांशी ताळमेळ नाही. दोन्ही एकमेकांचे जणू सावत्र भाऊ आहेत असेच वाटते, फांद्यांची छाटणी असो, उडणारे लाईट असोत, पोलची दुरावस्था असो, हे काम आमचे नाही त्यांचे आहे असे सांगून एकमेकांवर जबाबदारी ढकलतात, बाबांनो एकमेकांचे एव्हढे सावत्रभाव ठेवण्यापेक्षा मावसभाऊ बना आणि आपली जबाबदारी पार पाडा. त्याच मंदीरालगतचा एम-31 नंबरच्या पोलवरील दिवा गेल्या  अडीच महिन्यापासून बंद आहे मग पालिकेचे फिरते (भटके) विद्युत पथक नेमके करते काय? आपण आज आवाहनात्मक पोस्ट समाज माध्यमावर टाकली .. लागलीच दखल घेत पालिकेचे विद्युत अभियंता बागुल साहेब, नगरसेविका सुपुत्र योगेशभाऊ ईशी, शेजारच्या वार्डाचे कर्तव्यतत्पर नगरसेवक हर्षभाऊ रेलन या तिघांनी माझ्या मोबाईलवर संदेश पाठविला की, सदर लाईट उद्या सोमवारी नक्की लावण्यात येईल असे आश्वासन दिल्याने मोगलाई युनिट विज वितरण कंपनी व महापिालका विद्युत विभाग यांचे आपण ‘जर तारी’ (जर  काम झाले तर) आभार मानत आहोत असे नमूद करून गो.पि. लांडगे यांनी दोघा एकमेकांच्या मावसभाऊंना धन्यवाद दिले. 
******

Post a Comment

0 Comments