Header Ads Widget

* नरडाणा महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा*




 नरडाणा --  म. दि. सिसोदे कला, वाणिज्य, सायन्स महाविद्यालयात  शिक्षक दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. सजीवकुमार सिसोदे हे होते. तसेच प्रमुख अतिथी मा. प्राचार्य डॉ. के. एस गिरासे सर प्रमुख अतिथी होते. प्रथम प्रास्ताविक डॉ यू. जी. पाटील यांनी केले व सर्वपल्ली राधा कृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
         शिक्षक दिन याचे ओचित्य साधून मा.प्राचार्य डॉ. के. एस गिरासे यांनी प्राचार्य पदाची सूत्र आपल्या हाती घेतली. त्यांनी आपल्या मनोगतात स्वामी विवेकानंद, राधाकृष्णन यांच्या व्यक्तिमत्ववर प्रकाश टाकला. भारतीय संस्कृती दर्शन प्रेरणा स्रोत आहे असे सांगितले. पदभार स्वीकारून या महाविद्यालयाचा नवलोकिक करू असे प्रतिपादन केले. प्राचार्य साहेबांचे स्वागत अध्यक्ष संजयकुमार सिसोदे यांनी केले, मावळते प्राचार्य यू. जी. पाटील यांनी आपले कार्य करत असतांना सर्वांनी मदत केली या बद्दल आभार व्यक्त केले. प्रा. दत्तात्रय धिवरे यांनी यू. जी. पाटील सर यांचा सत्कार करण्याची विनंती केली व सत्कार करण्यात आला. या वेळी स्टेट बँक चे साहेब देखील उपस्थित होते. महाविद्यालय

Post a Comment

0 Comments