Header Ads Widget

*सेमी इंग्लिश स्कुल वारूड येथे बाल आनंद मेळावा साजरा*




नरडाणा---जि. प.सेमी इंग्लिश स्कुल वारूड शाळा क्रमांक 1व 2 यांनी बाल आनंद मेळावा साजरा केला. या कार्यक्रमाचे उदघाट्न राष्ट्रीय सेवा योजनाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डी. ए. सिरसाठ, सीसोदे महाविद्यालय नरडाणा यांनी केले. या प्रसंगी सेमी इंग्लिश स्कुल चे मुख्याध्यापिका श्रीमती वंदना गोकुळ पाटील, मुख्याध्यापिका मनीषा पंडित बोरसे, पल्लवी यशवंत बागुल, अश्विनी दिलीप भामरे, शर्मिला सुनील चत्रे, सुरेखा श्रावण ठाकरे प्राथमिक शिक्षिका व ग्रामस्थ तथा प्रा. डी. एस धिवरे, प्रा आर. एस. भदाणे, प्रा. यू. एस. पाटील, प्रा.रोहित कुलकर्णी यांची उपस्थिती होती. या आनंद मेळाव्यात भारतीय संस्कृतीचे दर्शन खाद्य पदार्थ अन्नद्वारे करण्यात आले. अनेक प्रदेशाचे खाद्यपदार्थ तयार करून ठेवण्यात आले होते. नरडाणा महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी व बालगोपाल यांनी याचा आनंद घेतला.

Post a Comment

0 Comments