शिंदखेडा ( यादवराव सावंत ) प्रतिनिधी :- उल्हास नवभारत साक्षरता मेळाव्यात विभागस्तरावर नाशिक येथे मुख्याध्यापक अशोक अमृतसागर, गणेश हायस्कूल, शेवाडे ता.शिंदखेडा यांची शिल्पाकृती व पोस्टर ची निवड करण्यात
आली. दि. 6 डिसेंबर 2024 रोजी श्री. रावसाहेब थोरात सभागृह गंगापूर रोड, के.टी.एच. एम. काॅलेज जवळ नाशिक येथे आयोजित करण्यात आले आहे.ही कलाकृती ग्रामीण भागातील पारंपारिक वाया गेलेल्या नैसर्गिक वस्तुं पासून तयार करण्यात आली आहे. विविध आकाराचे अनेक भोपळे वापरुन विशिष्ट आकाराच्या लाकडी फांदीवर ते टांगले आहेत. त्यावर नव साक्षरांसाठी संदेश दिला आहे.अगदी नाविन्यपूर्ण शिल्पकलाकृती तयार केली आहे. तसेच दोन पोष्टरही याच आशयाचे याठिकाणी मांडले जाणार आहेत.
यासाठी शिंदखेडा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी डॉ सी.के.पाटील, शि.वि.अधिकारी श्रीमती शैलजा शिंदे, शि.वि.अधिकारी मा.दिपकजी सोनवणे, केंद्रप्रमुख आर.जी.राजपूत, गणेश हायस्कूल, शेवाडे चे शिक्षक/शिक्षकेतर वृंद यांनी मार्गदर्शन करुन अभिनंदन केले.
0 Comments