Header Ads Widget

बेटावद येथे श्रीमान.फ.मु. ललवाणी विद्यालयात करिअर कौन्सिलिंग कार्यशाळेचे आयोजन




बेटावद प्रतिनिधी 

शिंदखेडा तालुक्यातील बेटावद येथे आज सोमवार दिनांक 2/12/24 रोजी इयत्ता 10 वी नंतर करिअर साठी उपलब्ध असणाऱ्या विविध संधी, विविध क्षेत्रांसाठी आवश्यक असलेली प्रमुख कौशल्य आणि पात्रता तथा शैक्षणिक प्रवाह आणि करिअर बाबत अपेक्षा या मुद्द्यांवर मार्गदर्शन करण्यासाठी बेटावद चे सुपुत्र आदरणीय श्री. चेतनजी जैन यांनी आमच्या श्री .फ.मु. ललवाणी विद्यालयातील विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी आधी आपले ध्येय निश्चित करून आपल्या आवडीच्या क्षेत्रातील कौशल्य विकसित करावीत आणि येणाऱ्या 21 व्या शतकातील आव्हानांना धैर्याने सामोरं जावं असे आवाहन माननीय चेतन जैन करिअर समुपदेशक यांनी यावेळी केले. तसेच विद्यालयातील विद्यार्थ्यांना करिअरच्या वाटचालीबद्दल व ध्येयप्राप्ती बद्दल मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांच्या सर्व  शंकांचे निरसन करीत त्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले. यावेळी विद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य माननीय दादासाहेब श्री.डी.जी. पवार सर, उपप्राचार्य माननीय श्री. व्ही. पी. कढरे सर तसेच विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री . पी. व्हीं. माळी सर व विद्यालयातील इतर शिक्षक वृंद यावेळी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments