Header Ads Widget

*राष्ट्रवादीचे पदाधिकारींकडून दोंडाईचा शहरात राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या वाढदिवसा निमित्ताने विविध कार्यक्रम संपन्न..*


 दोंडाईचा प्रतिनिधी 
 शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा शहरात 22 जुलै रोजी राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडवणीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने राष्ट्रवादीचे जिल्हा युवक उपाध्यक्ष दीपक गिरासे व तालुका अध्यक्ष दीपक राव जगताप यांच्या सहकार्याने शहरात उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप तसेच शहरातील
 स्व. खंडू पाटील मतिमंद विद्यालय येथे विद्यार्थ्यांना लड्डू वाटप करून खऱ्या अर्थाने दोघी दिग्गज नेत्यांचा वाढदिवस करत सर्वांचे तोंड गोड केले.  रुग्णांना व अंध अपंग विद्यार्थ्यांना एक मदतीचा हात त्यांना देण्याचा प्रयत्न या माध्यमातून झाला त्यामुळे अशा कार्यक्रमामुळे समाजात कौतुकास्पद चर्चा झाली व त्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली.
         वाढदिवसानिमित्त महायुतीतील काही पदाधिकारी यावेळी उपस्थित होते राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश चिटणीस सौ पूजा खडसे भाजपच्या महिला जिल्हा अध्यक्षा चंद्रकला सिसोदिया, राष्ट्रवादीचे माधव देवरे उपसरपंच मांडळ, पाटील सर अध्यक्ष खंडू पाटील मतिमंद विद्यालय लिलेश देसले राष्ट्रवादी तालुका संघटक , दरबार गिरासे, राहुल कोळी, गोपाल कोळी पत्रकार, अण्णा कोळी पत्रकार, कैलास राजपूत पत्रकार, विकास बागुल, अमोल साळवे, राष्ट्रवादी व महायुतीचे असंख्य कार्यकर्ते सह जयदीप आयटीआय कॉलेजचे विद्यार्थी देखील यावेळी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments