Header Ads Widget

*मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त होळनांथे येथे रक्तदान शिबीर संपन्न रक्तदान केल्याने माणुसकीची नाळ घट्ट होते - बबनराव चौधरी*


होळनांथे : लोकनेते, दूरदृष्टी असलेले निर्णयक्षम नेतृत्व आणि महाराष्ट्राच्या विकासाची नवी दिशा देणारे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त दि. २२ जुलै रोजी 'महा रक्तदान संकल्प' उपक्रमाचे आयोजन माजीमंत्री आ. अमरीशभाई पटेल यांचा मार्गदर्शनाखाली शिरपुर विधान सभा मतदार संघातील शिरपुर शहर, ग्रामिण, थाळनेर, सांगवी भाजपा मंडळातर्फे होळनांथे येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिराचे उद्याटन  धुळे भाजपा मा. जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांचा हस्ते करण्यात आले. या विशेष दिवशी, समाजासाठी रक्तदान करण्याचा संकल्प आपण सर्वांनीच केला, रक्तदान हेच, सर्वश्रेष्ठ दान आहे कारण तुमच्या रक्ताच्या एका थेंबातून कुणाच्यातरी आयुष्याचा प्रकाश पुन्हा उजळू शकतो, सामाजिक बांधिलकी जपत विक्रमी संख्येने रक्तदान करूया हा केवळ एक उपक्रम नाही, तर जीवनदानाची चळवळ आहे. रक्तदान केल्याने माणुसकीची नाळ घट्ट होते असे धुळे भाजपा मा. जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी उद्याटनप्रसंगी सांगितले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी शिरपुर शहर, शिरपूर ग्रामिण, सांगवी व थाळनेर मंडलाच्या वतीने  रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते रक्तदान करणाऱ्यांना त्याच ठिकाणी सर्टिफिकेट देण्यात आले प्रसंगी धुळे मा. जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, माजी तालुकाध्यक्ष तथा वाघाडी सरपंच किशोर माळी, शिरपुर कृउबा समिती माजी सभापती नरेंद्र सिसोदिया, जिप मा. सदस्या सौ. सखुबाई पारधी यांच्या प्रमुख उपस्थितीत होळनांथे येथे शिरपुर शहराध्यक्ष चिंतनभाई पटेल, शिरपूर ग्रामिण मंडळध्यक्ष भरत पाटील, थाळनेर मंडळध्यक्ष विरुपाल राजपुत, सांगवी मंडळध्यक्ष योगेश बादल यांनी भव्य रक्तदान शिबीर आयोजित केले होते. यावेळी बोरगांव उपसरपंच योगेंद्रसिंग राजपुत, ग्रामिण युवा मोर्चा अध्यक्ष संदीप कुवर, सरचिटणीस अजिंक्य शिरसाठ, गणेश कोळी, रोहित माळी, लेखराज पटेल, प्रणव भदाणे, मुकेश लोहार, विकी पवार, विनोद भोई, योगेश पवार, कृष्णा कोळी, नरेश कोळी, सचिन पवार, चेतन राठोड, महेंद्र कोळी यांचासह आजी,माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, सक्रिय सदस्य, शक्ती केंद्रप्रमुख, बुथप्रमुख, तसेच नागरिक बंधू-भगिनी यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.

Post a Comment

0 Comments