Header Ads Widget

*शिंदखेड्यात ना.अजित पवारांच्या वाढदिवशी तीनशे विद्यार्थ्यांना वह्यांचे यांचे वाटप*

 शिंदखेडा - राज्याचे उपमुख्यमंत्री ना अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शिंदखेडा येथील माळीवाडा परिसरातील 300 विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. 
      राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे कार्याध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री, खासदार प्रफुल्ल पटेल यांचे स्वीय सहाय्यक राकेश माळी यांच्यातर्फे वह्यांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त पोलीस हवालदार लोटन माळी हे होते. यावेळी राष्ट्रवादी अजित पवार जिल्हा उपाध्यक्ष महिला, श्रीमती कलाताई माळी, भाईदास वाघ, वेडू माळी, रमेश माळी, सुदाम माळी, नाना माळी, गणेश खलाणे, राकेश परदेशी,सुनील परदेशी, कुणाल माळी व्यासपीठावर उपस्थित होते.
    संत सावतामाळी व्यायाम शाळेचे मित्र मंडळ आणि राकेश माळी मित्र मंडळ यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी परिसरातील भगिनीवर्ग, विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार मनीष माळी यांनी मानले.

Post a Comment

0 Comments