Header Ads Widget

*अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेश अध्यक्ष विजय कुमार घाडगे पाटील यांच्यावर राष्ट्रवादी अजित दादा पवार गटाच्या सुरज चव्हाण यांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ शिंदखेडा तहसीलदार यांना दिले निवेदन*


शिंदखेडा (यादवराव सावंत) प्रतिनिधी :- 
 अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेश अध्यक्ष  विजय कुमार घाडगे पाटील यांच्यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सुरज चव्हाण व त्यांच्या गुंड कार्यकर्त्यांनी भ्याड हल्ला केला त्यांच्या निषेधार्थ शिंदखेडा तहसीलदार यांना दिले निवेदन देवुन निषेध करण्यात आला.
या घटनेचा शिंदखेडा तालुका अखिल भारतीय छावा संघटना चे सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जाहीर निषेध केला असून संबंधितांनवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात येऊन, कठोर शासन करण्यात यावे ही मागणी शिंदखेडा तहसीलदार अनिल गवांदे यांच्याकडे करण्यात आली, यावेळी शिंदखेडा येथील छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष नंदकिशोर पाटील, अरुणदादा देसले,  पंकज चव्हाण सर, अनिल पवार, गोलु देसले, सागर देसले सर, आर. आर. पाटील,  निलेश निकम, चेतन देसले, रऊफ बागवान, उमाकांत पाटील, भुषण बागुल,  हिमांशु पाटील, स्वामी देसले, विक्की देसले, दर्शन पवार, रोहीत देसले, गुंजन पाटील, सचिन पवार, तसेच छावा संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments