Header Ads Widget

*शिंदखेडा शेतकरी बोर्डिंग संस्थेच्या प्रभारी अध्यक्षपदी वाल्मिक पाटील तर शालेय समितीच्या चेअरमनपदी जितेंद्र देसले यांची निवड*


शिंदखेडा (यादवराव सावंत) प्रतिनिधी :
शिंदखेडा येथील शेतकरी बोर्डिंग संस्थेच्या प्रभारी अध्यक्षपदी हातनूर येथील मा. जयकुमार रावल (मंत्री, पणन व राजशिष्टाचार) यांचे विश्वासू सहकारी आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक वाल्मिक दंगल पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. तसेच शालेय समितीच्या चेअरमनपदी जितेंद्र देसले यांचीही निवड करण्यात आली असून, दोन्ही निवडींमुळे संस्थेच्या कामकाजाला नवसंजीवनी मिळणार आहे.
दि. २३ जुलै रोजी संस्थेच्या सभागृहात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत, विद्यमान अध्यक्ष साहेबराव दौलतराव खरकार यांनी वैद्यकीय कारणास्तव अध्यक्षपद सोडत, प्रभारी अध्यक्षपदी वाल्मिक पाटील यांचे नाव सुचवले. हा ठराव सर्व संचालकांच्या एकमताने मंजूर झाला. त्याच बैठकीत संस्थेच्या शालेय समितीच्या चेअरमनपदी जितेंद्र देसले यांचीही सर्वानुमते निवड करण्यात आली.
नवीन नेतृत्वापुढील जबाबदाऱ्या
संस्थेच्या सामाजिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी नव्या नेतृत्वास अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांना सामोरे जावे लागणार आहे. संस्थेअंतर्गत सरस्वती विद्यामंदिर (प्राथमिक), किसान विद्यालय (माध्यमिक), भडणे येथील सी. बी. देसले विद्यालय, तसेच शेतकरी बोर्डिंगचे वसतिगृह यांच्यावर प्रभावी देखरेख ठेवून गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि शिस्तबद्ध व्यवस्थापन यांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.
संस्थेच्या बैठकीस सचिव प्रकाश पाटील, भबुतराव देसले,तन्मय देसले, गोपाळराव सोनवणे यांच्यासह इतर मान्यवर सदस्य उपस्थित होते.बैठकीत भावी विकास आराखड्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक श्री एस एस पवार, मुख्यधापिका ज्योती देसले
ज्येष्ठ शिक्षक एस ए वाडीले, श्रीमती.एस बी धिवरे जे डी भदाणे एस एम बागुल एस बी सोनवणे बी.पी.पवार शानाभाऊ सोनवणे डी एम जाधव आर एस पाटील बीएम बागुल व्ही जे पाटील श्रीमती.एस एस पाटील,एन डी पाटील एस एम देसले आशा पवार 
शिक्षकेतर कर्मचारी लिपिक पी व्ही पाटील व्ही एस पाटील, एन.जी पाटील,श्रीमती एम एस वाडीले ए एस भदाणे,श्रीमती. व्हि.एन सिसोदे ,श्रीमती यु एस पवार 
शेतकरी बोर्डिंग तर्फे अधीक्षक भीमसिंग गिरासे कर्मचारी प्रेमसिंग गिरासे  यांच्यावतीने सत्कार करण्यात आला
शिंदखेडा परिसरातील शिक्षण व संस्थात्मक नेतृत्वासाठी ही निवड मोलाची असून, दोन्ही नविन पदाधिकाऱ्यांकडून कार्यकुशल, पारदर्शक आणि समाजाभिमुख कामाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments