जिल्ह्यातील शिंदखेडा तालुकाअंतर्गत नरडाणा मंडळात विविध प्रकारचे लोकांभिमुख कार्यक्रम यशस्वीपणे व खेळीमेळीच्या वातावरणात घेण्यात आलेत.त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान अंतर्गत विविध दाखले वाटप करणे, शिव रस्ते मोकळे करून रस्ताच्या बाजूने दुतर्फा झाडे लावणे, डीबीटी प्रणाली अंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या घरोघरी जाऊन भेटी घेऊन त्यांच्याकडून आधार अपडेट करणे व बँक पासबुक झेरॉक्स घेणे यासारखी विविध प्रकारची घरोघरी जाऊन करण्यात आली असे. शासकीय जमिनीवरील अतिक्रमण काढणे याबाबत आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या, एम्स सॅन्ड बाबत प्रस्तावित गट शोधणे व कार्यवाही करणे, व शासकीय कर्मचारी यांना त्यांच्या केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल पुरस्कार वितरित करणे यासारखे अनेक कार्यक्रम घेण्यात आले असे. त्यातच नरडाणा मंडळ अंतर्गत उत्कृष्ट पीक पाहणी केलेले सहाय्यक, ग्राम महसूल अधिकारी,महसूल सेवक पोलीस शिंदखेडा तालुका पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष व मेलाने पोलीस पाटील यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दलपाटील त्यांच्या केलेल्या कार्याबद्दल प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आले असे. सदर कार्यक्रम मंडळ अधिकारी नरडाणा स्वाती वाघ यांनी व त्यांच्या टीम ने आनंदाने पार पाडले असे. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रफुल मोरे ग्राम महसूल अधिकारी नरडाणा मोनाली पवार माळीच , महेंद्र पाटील जातोडा , गोविंदा माळी वारुड , पीकपहानी सहाय्य्क अमृत शिंदे नरडाणा , व जितेंद्र सोनवणे वारुड ,किशोर ठाकरे माळीच , हरीश पटेल जातोडा, नितीन बोरसे मेलाने जगदीश सोनवणे पाष्टे,महसूल सेवक पाष्टे सुरेश कोळी आदीचा सन्मान करण्यात आला असे.नरडाणा मंडळात कर्मचारी यांनी केलेल्या कामाची दखल स्वतः मंडळ अधिकारी नरडाणा स्वाती सुभाष वाघ यांनी घेतली असे.
0 Comments