शिंदखेडा (यादवराव सावंत) प्रतिनिधी :- शिंदखेडा येथे सालाबादाप्रमाणे होणाऱ्या श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या समाधी संजिवन सोहळा निमित्ताने होणारा श्री संत सावता महाराज मंदीर अखंड हरिनाम संकिर्तन सप्ताह व ग्रामदैवत श्री हनुमंतरायांचा श्रीराम मारूती मंदीर शिंदखेडा,अखंड हरिनाम संकिर्तन सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा हया अखंड हरिनाम सप्ताहात सुप्रसिद्ध महाराष्ट्रातील किर्तनकार महाराजांचे कीर्तन संपन्न झाली. नियोजित सालाबादप्रमाणे किर्तन सेवा यजमान यांनी सहभागी होऊन सहकार्य करत सेवा पार पाडली. शहर व परिसरातील भक्त भाविकांनी मनोभावे सेवा सप्ताह निमित्त सहभागी होऊन योगदान दिले. शेवटच्या सांगता समारोपात शहरातील मिरवणूकीने नागरिकांचे लक्ष वेधुन घेतले होते. त्या निमित्ताने काल सकाळी ९:०० वाजता ह.भ.प.अशोक महाराज विखरणकर यांचे काल्याचे किर्तन झाल्यावर भव्य महाप्रसादाचा(भंडारा) दु.१२ ते ३ वा. आयोजित करण्यात आला तसेच सायंकाळी ६ वा मारोती रायाची भव्य पालखी मिरवणुक मारोती मंदिर पासुन शहरातील मुख्य रस्त्यावरुन निघाली.सवादयाने वारकरी, बालगोपाल मुले मुली, तरुण, महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक भक्तांनी मनमुराद आनंद घेत जयघोषात मिरवणूक शांततेत पार पडली. तरी यासाठी श्री संत सावता महाराज मंदीर,श्री संत शिरोमणी सावता महाराज मंदीर,माळीवाडा
शिंदखेडा समस्थ ग्रामस्थ मंडळ,श्रीराम मारूती मंदीर,श्री संत सावता महाराज भजनी मंडळ माळीवाडा. समस्त महीला भजनी मंडळ,बालगोपाल भजनी मंडळ,शिंदखेडा यांनी अथक प्रयत्नाने सदरचे दोन्ही सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करुन संपन्न केला.
0 Comments