बेटावद प्रतिनिधी
शिंदखेडा तालुक्यातील वारूड येथे दि.०९/०६/२०२५ रोजी ते दि.२०/०६/२०२५ या कालावधीत विलास केशव दोरीक, संगिता विलास दोरीक दोन्ही रा.वारुड, ता.शिंदखेडा, जि.धुळे, एजंट. मनिष मानिक पवार रा. अकोला (पुर्ण पत्ता माहित नाही), नवरी प्रतिक्षा निलेश लहाणे, ज्योती निलेश लहाणे दोन्ही रा. अकोला, नयना परसराम राठोड व शोभा परसराम राठोड सर्व रा. अकोला पुर्ण पत्ता माहित नाही अशांनी लग्न लावण्याचे आमीष दाखवून नवरी मुलींचे खोटे दाखले व आधारकार्ड बनवुन त्यांचेशी लग्न जुळवून देण्याचे आमीष दाखवून त्या नवरी मुलींचे यापुर्वी लग्न झालेले असतांना देखील आर्थिक फसवणुक करण्यासाठी लबाडीने लग्नासाठी मुली दाखवून, त्यांचेशी लग्न लावून देण्याचे मोबदल्यात नवरा हुकूमचंद साहेबराव भदाणे वय ३४ रा. वारुड ता. शिंदखेडा जि. धुळे यांचेकडून २,७०,०००/-रुपये व योगेश हिंमत सोनवणे रा. वारुड ता. शिंदखेडा जि.धुळे याचेकडून २,७०,०००/-रुपये प्रमाणे असे मिळुन एकुण ५,४०,०००/-रुपये घेतले. लग्नानंतर वरील नवरी मुली थोडे दिवस सासरी राहुन त्यांना लग्नात दिलेले दागिने व नवरी प्रतिक्षा निलेश लहाणे हिने नवरा -हुकूमचंद साहेबराव भदाणे यांचे घरातील ५,०००/-रु.किं.चा मोबाईल व ७५,०००/-रु.किं.चा १५ ग्रॅम वजनाचा सोन्याचा तुकडा असे चोरी करुन घेवून पसार झाली बाबत नवरा हुकूमचंद साहेबराव भदाणे वय ३४ रा. वारुड ता.शिंदखेडा जि.धुळे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन वरनमुद आरोपीतांविरुध्द भारतीय न्याय संहिता सन २०२३ चे कलम ३१८(४),३१६ (२), ३१८(१), ३३६ (२), ३३६(३),३४० (२),३१८(२), ३०३(२),३ (५) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. सदर गुन्हयाचा तपास पोउनि/रविंद्र महाले यांचेकडे असतांना त्यांनी व पोलीस पथकाने वरनमुद आरोपीतांचा शोध घेत असतांना आरोपी विलास केशव दोरीक वय ४३, संगिता विलास दोरीक (संगीता बंडू डांगे) वय ३५, दोन्ही रा. वारुड, ता.शिंदखेडा, जि.धुळे यांचा शोध घेवून त्यांना शिताफीने ताब्यात घेवून अटक करुन उल्लेखनीय कामगिरी केली आहे. उर्वरीत आरोपीतांचा शोध सुरु आहे
सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री. श्रीकांत धिवरे, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. अजय देवरे व मा.श्री. सुनिल गोसावी, उप विभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली नरडाणा पो.स्टे.चे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे, पोउनि रविंद्र महाले, पोहेकॉ ललीत पाटील, भरत चव्हाण, राकेश शिरसाठ, पोना/भुरा पाटील, पोकों/विनोद कोळी, मपोकों/अनिता पवार, चापोकों/सुरजकुमार सावळे अशांनी मिळून केली आहे
0 Comments