Header Ads Widget

वारुड येथे लग्न लावण्याचे आमिष दाखवून तरूण मुलांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत नरडाणा पोलीस ठाण्याच्या पथकाने एका दांमपत्यास अटक


शिंदखेडा तालुक्यातील वारुड येथे लग्न लावण्याचे आमिष दाखवून तरूण मुलांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत नरडाणा पोलीस ठाण्याच्या पथकाने एका दांमपत्यास अटक केली आहे.

उर्वरित संशयितांचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे. याप्रकरणी नरडाणा पोलीस ठाण्यात ७ जणांविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिंदखेडा तालुक्यातील वारुड गावात दिनाक ९ ते २० जून २०२५ या कालावधीत ही फसवणुकीची घटना घडली. विलास केशव दोरीक आणि संगिता विलास दोरीक उर्फ संगीता बंडू डांगे दोघे रा. वारुड या दांम्पत्याने एजंट मनिष मानिक पवार रा. अकोला, नवरी मुलगी प्रतिक्षा निलेश लहाणे, तिची आई ज्योती निलेश लहाणे रा. अकोला, नवरी मुलगी नयना परसराम राठोड आणि तिची आई शोभा परसराम राठोड रा. अकोला या ७ जणांनी लग्न लावण्याचे आमीष दाखवून नवरी मुलींचे खोटे दाखले आणि आधारकार्ड बनवत लग्न जुळवून देण्याचे आमीष दाखवले.

संबधित नवरीचे यापुर्वी लग्न झालेले असताना आर्थिक फसवणूक करण्यासाठी लबाडीने लग्नासाठी मुली दाखवून, त्यांचेशी लग्न लावून देण्याचे मोबदल्यात नवरा मुलगा हुकूमचंद साहेबराव भदाणे (३४) रा. वारुड आणि योगेश हिंमत सोनवणे रा. वारुड यांच्याकडून प्रत्येकी २ लाख सत्तर हजार रुपये असे एकूण ५ लाख चाळीस हजार रुपये उकळले. लग्नानंतर काही दिवसांनी प्रतिक्षा लहाणेने नवरा हुकूमचंद भदाणे यांच्या घरातील ५ हजारांचा मोबाईल आणि अंदाजे ७५ हजार रुपये किंमतीचा १५ ग्रॅम वजनाचा सोन्याचा तुकडा चोरून पलायन केले. याप्रकरणी हुकूमचंद भदाणे यांनी नरडाणा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून वरील ७ जणांविरुध्द भारतीय न्यायसंहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक रविंद्र महाले यांनी करुन त्यांच्यासह पोलीस पथकाने यातील संशयीत आरोपी विलास दोरीक (४३) व संगिता दोरीक (३५) यांना अटक केली आहे. उर्वरित संशयित आरोपींचा शोध सुरू आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, शिरपूर उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक सुनिल गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments