शिव पानंद शेत रस्ता चळवळीच्या पदाधिकाऱ्यांना असे आश्वासित केले की लवकरच सर्व तहसीलदार, पोलीस प्रशासन, भूमी अभिलेख, व चळवळीच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित करून शेतकऱ्यांच्या शेत रस्त्याविषयी प्रश्न मार्गी लावू".
श्री. भाग्यश्री विसपुते मॅडम
धुळे जिल्हाधिकारी.
आसिफ पठाण बेटावद प्रतिनिधी
सोमवार दि.२१ ७ २०२५ रोजी श्री शरद पवळे चळवळीचे अध्यक्ष व श्री जंगले पाटील राज्य समवयक यांच्या मार्गदर्शनाखाली शिवपानंद शेत रस्ता चळवळ धुळे जिल्हा कृती समितीच्या वतीने धुळे जिल्ह्यातील शिवपानंद शेत रस्ते लवकरात लवकर खुले करण्यासाठी धुळे जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व तहसीलदार, भूमीअभिलेख, पोलीस प्रशासन यांची जिल्हाधिकार्यालय येथे संयुक्त बैठक आयोजित करावी यासाठी धुळे जिल्ह्यातील कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
महाराष्ट्र शासन महसूल विभाग मार्फत दरवर्षी महाराजस्व अभियान राबवते परंतु त्याची तालुकास्तरीय हवी तशी अंमलबजावणी होताना दिसत नाही शिव आनंद शेत रस्ता चळवळीच्या माध्यमातून
आमचे सर्व सदस्य प्रत्येक तहसील कार्यालय स्तरावर अधिकारी व शेतकरी यांचा सन्मनवय साधून शेतकरी वर्गास रस्ता प्रश्नावर न्याय देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. परंतु काही तालुक्यात तालुका प्रशासनाकडून हवा तसा प्रतिसाद मिळत नाही त्यामुळे जिल्ह्यातील बऱ्याच ठिकाणी रस्त्याच्या बाबतीत फौजदारी गुन्हे संख्या वाढताना दिसत आहे. शेतकरी वर्गाची बरीचशी वेळ कोर्ट, कचेरी, पोलीस, येथे हेलपाटा मारण्यात जात आहे. त्यामुळे रस्त्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे तरी मा. जिल्हाधिकारी यांनी या गोष्टीकडे तात्काळ लक्ष देऊन शेत रस्ते खुले करण्याबाबत तहसीलदारांना आदेश द्यावेत.
शेतकऱ्यांच्या पिढ्या-पिढ्या चाललेल्या संघर्ष संपुष्टात आणण्यासाठी तातडीने आपल्या जिल्ह्यातील सर्व रस्ता या विषयासंबंधीत तालुकास्तरीय अधिकारी यांची चळवळीच्या सर्व सदस्या समवेत आपल्या कार्यालयात बैठक आयोजित करावी जेणेकरून शेत रस्ते अभियान राबवून रस्त्याबाबत जिल्ह्यातील सर्व शेतकरी वर्गाचा प्रश्न सुटेल अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
या निवेदनावर शिवपानंद शेत रस्ता चळवळ धुळे जिल्हा कृती समितीचे गुणवंत पवार बेटावद, संजय बच्छाव, अनिल पाटील, सुनिल पाटील, सौ.अनिता गिरासे, सौ.ममता गिरासे, अजय पाटील, दिपक जगताप, गुलाब पाटील, मंगेश सोनवणे, दिलीप सालुके, मधुकर सोनवणे, समाधान आजगे, सागर आजगे, समाधान मराठे, आदिचे निवेदनात सह्या आहे
0 Comments