Header Ads Widget

*पश्चिम रेल्वेच्या ताप्ती सेक्शन वरुन पुणे गाडी सुरू न झाल्यास रेल रोको आंदोलन* *मंत्री रावल यांना निवेदन* पश्चिम रेल्वे प्रवाशी संघटना

दोंडाईचा ( दि २६/७/२०२५) गेल्या अनेक वर्षांपासून पुणे येथे जाण्यासाठी संपुर्ण पश्चिम खान्देशच्या प्रवाशांना एकही प्रवाशी गाडी नाही अनेकदा मागणी करुन रेल्वे प्रशासन फक्त रेल्वे बोर्डाकडे जबाबदारी ढकलत मागणीकडे दुर्लक्ष करते म्हणुन आज महाराष्ट्र राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री मा ना जयकुमार भाऊ रावल यांना  शिंदखेडा रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष गोविंद दादा मराठे 
पश्चिम रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य प्रविण महाजन
 रेल्वे समितीचे सिध्दार्थ सिसोदे इ पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन निवेदन दिले .
निवेदनचा आशय असा कि वास्तविक पुणे हे शिक्षणाचे माहेरघर त्याचप्रमाणे औद्योगिक क्षेत्रासोबत संगणक क्षेत्रातील अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे कार्यालये हे पुण्यात आहेत यामुळे संपूर्ण धुळे नंदुरबार तसेच जळगांव जिल्हातुन दररोज किमान ५०० खासगी बसेस पुण्यासाठी धावतात त्यामुळे प्रवाशांना वेळ ,पैसा व श्रम अधिकचे पडतात  सणासुदीच्या काळात खाजगी बसेस प्रवाशांकडुन जास्तीचे दिड ते दोन हजार रु घेतात तरी प्रवाशांची हि लुट निव्वळ पुणे जाण्यासाठी संपुर्ण तापी सेक्शन वरुन एकही गाडी नाही म्हणुन सुरु आहे पश्चिम खान्देशसाठी (तापी सेक्शन) पुणेसाठी लवकरच प्रवाशी गाडी सुरु करावी तरी आता लवकरात लवकर रेल्वे प्रशासनाने पुणे गाडीची घोषणा करावी अन्यथा १५ आँगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर दोंडाईचा शिंदखेडा नरडाणा रेल्वे स्थानकावर रेल रोको आंदोलन करण्यात येईल.
तसेच पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांसाठी भुसावळ -मुंबई सेंट्रल (०९०५१/५२)नविन प्रवाशी रेल्वे आपल्या ट्रेन आँन डिमांड अशा प्रायोगिक तत्त्वावर सुरु होऊन सदर प्रवाशी गाडीला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे प्रवांशांची मोठी सोय निर्माण होऊन रेल्वे प्रशासनाला अपेक्षेपेक्षा अधिक उत्पन्न मिळत आहे सदर गाडी प्रायोगिक तत्त्वावर सुरू असुन सदर गाडीचे  रुपांतर खान्देश एक्स्प्रेसमध्ये करुन कायमस्वरूपी करावी तसेच भुसावळहुन सदर एक्स्प्रेस  २ तास उशिराने तसेच दादरहुन २ तास आधी सोडण्यात यावी जेणेकरून प्रवाशांची सोय होईल 
तापी सेक्शन वरील दिवसा धावणारी विकासवाहिनी कोविड काळापासून सुरत- नंदुरबार व नंदुरबार-भुसावळ(०९०७७/७८) अशा दोन टप्प्यांत धावते तरी सुरत येथे प्रवास करणारे जेष्ठ नागरीकांसह आबालवृद्ध महिला प्रवाशांना दोन टप्प्यांत प्रवास करावा लागतो तरी सदर पँसेन्जर सलग सुरत-भुसावळ थेट करण्यात यावी.
१९००६,१९००८,१९१०६  भुसावळ- सुरत ह्या  पँसेन्जर व मेमु गाडी मध्यरात्री मागोमाग धावतात त्याऐवजी ह्यापैकी २ गाड्या पहाटेपासून योग्य अंतराने सोडण्यात याव्यात जेणेकरून प्रवाशांची सोय होऊन रेल्वेला उत्पन्न मिळेल.
          शिंदखेडा रेल्वे स्थानकावर पुरी अहमदाबाद 12844/12845
बरोनी अहमदाबाद 19483/19485 भागलपूर सुरत22947/22948
 प्रेरणा एक्सप्रेस 22137/22138 या जलद गाड्यांना शिंदखेडा येथे थांबा मिळावा व
वरील सर्व मागण्या रेल्वे प्रशासनाने लवकरात लवकर पूर्ण कराव्यात अन्यथा दोंडाईचा स्थानकांवर १५ आँगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर रेल रोको आंदोलन करण्यात येईल तसेच आंदोलनात झालेल्या नुकसानीस रेल्वे प्रशासन जबाबदार राहिलं अशा आशयाचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री मा ना जयकुमार भाऊ रावल यांना रेल्वे स्थानकावर  शिंदखेडा रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष गोविंद दादा मराठे पश्चिम रेल्वे सल्लागार समिती सदस्य प्रवीण महाजन  नरडाणा रेल्वे समितीचे अध्यक्ष सिध्दार्थ सिसोदे यांनी दिले निवेदनाच्या प्रती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक यांना पाठवलेले असुन निवेदनावर भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष नारायण पाटील जिल्हा सरचिटणीस डि एस गिरासे दोंडाईचा शहराध्यक्ष जितेंद्र गिरासे दोंडाईचा ग्रामीण अध्यक्ष शिंदखेडा  ग्रामीण अध्यक्ष मोतीलाल कोळी दिपक बागल माजी नगरसेवक कृष्णा नगराळे भरतरी ठाकुर संजय मराठे मनोज निकम संजय अग्रवाल राकेश अग्रवाल अनिल सिसोदिया राकेश माहेश्वरी नरेंद्र गिरासे पंकज चौधरी भिकन बागवान नदीम कुरेशी इ पदाधिकाऱ्यांची स्वाक्षरी केलेली आहे.

Post a Comment

0 Comments