Header Ads Widget

*संत शिरोमणी सावता महाराज मंदिरात अखंड हरिनाम किर्तनी सप्ताहाची सांगता...*. *श्री.संत सावता महाराजांच्या भव्य पालखी मिरवणूक*

     शिंदखेडा (यादवराव सावंत) प्रतिनिधी :-     शिंदखेडा येथील माळीवाडा दरवाजा मारोती मंदिरात श्री. संत शिरोमणी सावता महाराज अखंड हरिनाम किर्तनी सप्ताहाची सुरुवात सतरा जुलै पासुन झाली. तर सांगता चोवीस जुलै रोजी काल्याचे किर्तनाने करण्यात आली. त्याच दिवशी संध्याकाळी सात वाजता श्री. संत सावता महाराज यांची भव्य मिरवणूक शिंदखेडा शहरातील माळीवाडा, जनतानगर, सह मुख्य रस्त्यावरुन काढण्यात आली. हयावेळी भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.ज्येष्ठ संत सावतामाळी यांची परंपरा गेल्या अनेक शतकापासुन शहरात सुरु आहे. संत परंपरेने पावन झालेल्या शिंदखेडा शहरात श्री. संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळा निमित्त अखंड हरिनाम किर्तनी सप्ताह ही परंपरा सलग दिडशे वर्षापासून जपली गेलेली आहे. सालाबादप्रमाणे हयावर्षीही भाविक भक्त आणि ग्रामस्थ मिळुन हा सोहळा साजरा केला जात असतो. अखंड हरिनाम सप्ताहात तर शहर नुसतं राम कृष्ण हरी च्या जयघोषात न्हाहुन जाते. शहरातील लहानापासुन मोठ्यांपर्यत प्रत्येक जण सेवेत, किर्तनात, भजनात आणि नामस्मरणात सहभागी झाला होता. हीच खरी ग्रामसंस्कृती आणि खरी आध्यात्मिक प्रगती आहे. या निमित्ताने संयोजक मंडळी, वारकरी, वडीलधारी, तरुण मित्र मंडळ यांच्या भक्ती भावामुळेच ही पवित्र परंपरा पार करून आजही तेजस्वी पणे सुरु आहे. सप्ताहात अनेक नामवंत महाराजांचे किर्तनाचा लाभ हयावेळी मिळाला. श्री. संत सावता महाराज पालखी मिरवणुकीने सांगता करण्यात आली. तर महाप्रसादाचा लाभ दिला. विविध यजमान यांनी भक्ती भावे सेवा देवुन हया कार्यास झोकून दिले होते. हयाकरिता श्रीराम मारोती मंदिर, संत सावता बालगोपाल हरिपाठ मंडळ, महिला भजनी मंडळ यांचे सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments