Header Ads Widget

*शहादा तालुक्यातील कवठळ दारुबंदी महिला युवा मोर्चाचा दहाव्या वर्धापन दिनी कार्यक्रम*


 शिंदखेडा ( यादवराव सावंत) प्रतिनिधी :-.                        नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात असलेले कवठळ गावाच्या महिलांनी गेल्या अनेक वर्षापासून दारुबंदी गाव हा पवित्रा हातात घेतला होता. त्या अनुशंगाने आज पर्यंत दारुमुक्त गाव बनले आहे. शिवाय गावात दारु तयार व विक्री देखील होत ही विशेष बाब आहे. त्यानिमित्ताने दारुबंदी मोर्चा च्या अध्यक्षा गीतांजली ताई कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र दारुबंदी महिला युवा मोर्चा चा दहावा वर्धापन दिवस साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शहादा पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक निलेश देसले, साहुरचे सामाजिक कार्यकर्ते राहुल सोनवणे, कमरावद च्या उषाताई कोळी, शहादा येथील रेखाताई कोळी, कवठळ गावाचे सरपंच, पोलीस पाटील सह गावातील बहुतांश महिला कार्यकर्त्यां व कवठळ गावातील शंभर टक्के महिला रहिवाशी उपस्थित होत्या. हयावेळी महिला दारुबंदी मोर्चा अध्यक्ष गीतांजली कोळी, पोलीस निरीक्षक निलेश देसले सामाजिक कार्यकर्ते राहुल सोनवणे यांनी आपल्या मनोगतातुन दारू विषयी फायदे व नुकसान यावर महिला व पुरुषांना मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे महिलांनी सहकार्य केल्याबद्दल विशेष आभार मान्यवंरानी मानले. हयावेळी लहान मुलांना खाऊ वाटप व भोजनाचा आस्वाद घेऊन कार्यक्रम खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाला. सदरील गावाचे आदर्श इतर गावाने ही घेऊन एक नवा आदर्श निर्माण करणे आज काळाची गरज आहे. हयामुळे कुटुंब उधवस्त होण्यापासून वाचते. दारुबंदी महिला युवा मोर्चा ने घेतलेल्या समाजोपयोगी कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments