Header Ads Widget

*शिंदखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांचे निवेदन देण्यासाठी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे सह शिवसैनिकांना पोलीसांनी केले अटक*

शिंदखेडा (यादवराव सावंत )प्रतिनिधी :- 
शिंदखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी व विविध मागण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री मा. ना. माणिकराव कोकाटे यांना निवेदन देण्यासाठी शिवसेना (उबाठा) गटाचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे व शिवसैनिक जात असताना शिंदखेडा तालुक्यातील बाबळे फाट्याजवळ पोलीस फोज फाट्याने आळवले त्यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी सांगितले की आम्ही सनदशीर मार्गाने निवेदन देण्यासाठी जात आहोत असे सांगितले तरी पोलीसांनी बळाचा वापर करून त्यांना अटक केले त्यावेळी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या गाड्यांच्या ताफ्याला शिवसैनिकांनी संतप्त होऊन काळे झेंडे दाखवून ताशपत्ते ताफ्याकडे फेकत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात शेतकऱ्यांना भिकारी म्हणणारे माणिकराव कोकाटेंच्या बैलाला भो, निमका पत्ता कडवा है माणिकराव कोकाटे भडवा है, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे मुर्दाबाद,कोण आला रे कोण आला कृषी खात्याचा ढेकून आला,वापस जाव वापस जाव ढेकूण माणिकराव वापस जाव, कृषी खात्याला ओसाड गावची पाटील कि म्हणणारा माणिकराव वापस जाव, शेतकऱ्यांचे सात बारे कोरे झालेच पाहिजे, शिंदखेडा तालुक्याचा समावेश पोखरा योजनेत झालाच पाहिजे, धुळे जिल्हा येथे कृषी विद्यापीठ स्थापन झालीच पाहिजे, शेतकऱ्यांना १८ तास विज पुरवठा मिळालाच पाहिजे, शेतकऱ्यांच्या मालाला दिड पट भाव मिळालाच पाहिजे अशा घोषणा देऊन कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा निषेध केला त्यावेळी पोलीसांनी काळे झेंडे व ताशचे पत्ते जमा केला तेव्हा शिवसेना उबाठा गटाचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे, मंगेश पवार, सर्जेराव आप्पा पाटील, छोटू पाटील,गिरीश देसले, डॉ मनोज पाटील,नंदकिशोर पाटील,रावसाहेब ईशी,राजु माळी, आधार बोरसे,अनिल वानखेडे सह अनेक शिवसैनिक यांना सोनगिर पोलिस ठाणे येथे अटक करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments