-विवाह इच्छुक जैन समाजातील युवक युवतींनी भारतीय जैन संघटनेने एकदम नव्याने विकसित केलेल्या परिणय पथ या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन खानदेश विभाग अध्यक्ष प्रा.चंद्रकांत डागा यांनी केले. ते शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा येथे जैन स्थानकात संवाद दौऱ्याअंतर्गत आयोजित सभेत बोलत
होते.सभेच्या अध्यक्षस्थानी जैन श्री संघाचे उपाध्यक्ष दिलीप बोथरा होते.व्यासपिठावर विभाग अध्यक्ष प्रा.डागा,विभाग महासचिव अशोक राखेचा,विभाग सचिव प्रकाश खींचा, जिल्हा सदस्य सुनिल बाफना,शिंदखेडा शहर अध्यक्ष मयूर ओस्तवाल,सचिव लखीचंद बोथरा,नरडाणा शहर अध्यक्ष डॉ.प्रितेश बोथरा आदी उपस्थित होते.प्रास्ताविक नरडाणा शहर महासचिव राहूल चोरडिया यांनी केले.
प्रा.डागा म्हणाले,आजची यूवा पीढी विवाहाला घेऊन एक नवी दृष्टी व वेगळा विचार करत आहे.त्यांची प्राथमिकता, अपेक्षा, वैवाहिक जीवनात संबंधी त्यांचा दृष्टिकोन पहिल्यापेक्षा खूपच वेगळा आहे. ही आवश्यकता लक्षात घेऊन भारतीय संघटनेने युवांसाठी जीवनसाथी निवडण्यासाठी परिणय पथ हे व्यासपिठ उपलब्ध करुन दीले आहे.
दोन भिन्न आयु वर्गासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे.ता.16 ऑगस्टला छत्रपती संभाजीनगर मध्ये 26 ते 30 वयोगटातील मुली व 28 ते 32 वयातील मुले तर 17 ऑगस्टला अहिल्यानगर येथे 22 ते 26 वयाच्या मुली तर 24 ते 28 वयाच्या मुलांसाठी. जास्तीत जास्त व इच्छुक युवक युवतींनी भाग घेण्याचे,तसेच संघटनेने चालविलेल्या फाउंडेशन कार्यक्रमाची तसेच स्मार्ट गर्ल,अल्पसंख्याक व ईडब्ल्यूएस कार्यशाळा घेण्याचेआवाहन केले.
या कार्यक्रम अंतर्गत हर्ष नवनीत देसरडा(92), रितेश सुमित संकलेचा (89.60), नमन हुकुमीचंद दुग्गड (85.50) आर्जव देवेंद्र जैन (87), प्राची सुनिल संकलेचा (64) या 10वी पास व चिन्मय सतीश कुमार चोरडिया 90 टक्के (डिप्लोमा इन कम्प्युटर) या विद्यार्थ्यांचा भेट वस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या संवाद यात्रेला समाजाचे 30 बंधू-भगिनी उपस्थित होते.उपाध्यक्ष सतीश चोरडिया यांनी फाउंडेशन कार्यक्रम अंतर्गत दर महिन्याला कार्यक्रम घेण्याचे व स्मार्ट गर्ल कार्यशाळा घेण्याची तयारी दर्शवत आभार प्रदर्शन केले.
0 Comments