- अमळनेर - पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षा निमित्ताने केंद्र व राज्य शासन देशभर विविध उपक्रम साजरी करत आहे . ही बाब निश्चितच अभिमानास्पद आहे राजमाता कुशल प्रशासक, जनकल्याणकारी व न्यायप्रिय म्हणून संपूर्ण भारताच्या इतिहासात अढळस्थान निर्माण केले आहे. अशा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विषयी सोशल मीडिया व फेसबुक वर सुनील गोपाळराव उभे मोबाईल नंबर 89 75 57 90 50 या मोबाईल नंबर वर या व्यक्तीने अत्यंत घृणास्पद अश्लील पोस्ट व अपमानास्पद शब्दप्रयोग करून देशातील समस्त धनगर समाजाच्या मनात चीड निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. या कृत्यामुळे महाराष्ट्र सह भारतात संतापाची लाट उसळली आहे.समाजाच्या भावना दुखवण्याचे गंभीर कृती आहे .याप्रकरणी सदर व्यक्तीवर कठोरात कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे. याप्रकरणी दुर्लक्ष झाल्यास सामाजिक जनक्षोभ वाढून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर प्रकरणी तात्काळ दखल घेऊन अपप्रवृत्तीवर कठोर शिक्षा करावी. ही विनंती अण्णा सो बन्सीलाल भागवत उपाध्यक्ष -महाराष्ट्र प्रदेश मौर्य क्रांती संघ , एस.सी. तेले सर ता. अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस भटक्या विमुक्त सेल ,संदीप घोरपडे सर अध्यक्ष- म .सा.प अमळनेर ,प्रा.अशोक पवार सर -अध्यक्ष युवा कल्याण प्रतिष्ठान, प्रा.सुभाष जिभाऊ पाटील संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती, रियाज शेख सामाजिक कार्यकर्ते, आबासाहेब हरचंद लांडगे माजी शहराध्यक्ष भाजप, गोपीचंद शिरसाट ता. अध्यक्ष मौर्य क्रांती संघ, प्रदीप कंखरे संचालक --प्रदिप अॅग्रो ,रमेशदेव शिरसाट अध्यक्ष हमाल मापाडी संघ, दिलीप ठाकरे, मनोहर मोरे ,अनिल धनगर ,विकास सूर्यवंशी, सौरव भागवत, दिलीप खांडेकर, प्रा . आर.पी. धनगर ,कैलास ठाकरे, जितेंद्र भालेराव , दिनेश धनगर ,नामदेव ठाकरे, तुकाराम ठाकरे, परशुराम ठाकरे आदींच्या निवेदनावर सह्या आहेत.
0 Comments