शिंदखेडा, ( यादवराव सावंत.) प्रतिनिधी :- पुणे येथे जाण्यासाठी पश्चिम खान्देशच्या प्रवाशांना एकही गाडी नाही. या मागणीकडे रेल्वे प्रशासन हे बोर्डाकडे जबाबदारी ढकलत दुर्लक्ष करत आहे. शिंदखेडा रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष गोविंद ( दादा ) मराठे व पश्चिम रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य प्रविण महाजन, सिध्दार्थ सिसोदे आदी पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री जयकुमार रावल यांची भेट घेऊन निवेदन दिले. या गाडीची घोषणा न झाल्यास १५ ऑगस्ट रोजी रेल रोकोचा इशारा निवेदनातून दिला आहे. शिक्षणाचे माहेरघर त्याचप्रमाणे औद्योगिक, संगणक क्षेत्रातील अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालये पुण्यात आहेत. धुळे, नंदुरबार तसेच जळगाव जिल्ह्यातून रोज किमान ५०० खासगी बसेस पुण्यासाठी धावतात. त्यामुळे प्रवाशांना वेळ, पैसा व श्रम अधिकचे पडतात. सणासुदीच्या काळात खासगी बसेस प्रवाशांकडुन जास्तीचे दिड ते दोन हजार रूपये घेतात. पुणे जाण्यासाठी संपुर्ण तापी सेक्शनवरुन एकही रेल्वे गाडी नाही म्हणुन ही लूट सुरु आहे.
पश्चिम खान्देशसाठी (तापी सेक्शन) पुणेसाठी लवकरच प्रवाशी गाडी सुरु करावी. लवकरात लवकर रेल्वे प्रशासनाने पुणे गाडीची घोषणा करावी अन्यथा १५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर दोंडाईचा, शिंदखेडा, नरडाणा रेल्वे स्थानकांवर रेल रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे.
*यासह इतरही मागण्या*
पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांसाठी भुसावळ-मुंबई सेंट्रल (०९०५१/५२) नविन प्रवाशी रेल्वे आपल्या ट्रेन ऑन डिमांड अशा प्रायोगिक तत्त्वावर सुरु होऊन सदर प्रवाशी गाडीला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. सदर गाडी प्रायोगिक तत्त्वावर सुरू असुन सदर गाडीचे रुपांतर खान्देश एक्स्प्रेसमध्ये करुन कायमस्वरूपी करावी. भुसावळहुन सदर एक्स्प्रेस २ तास उशिराने तसेच दादरहून २ तास आधी सोडण्यात यावी जेणेकरून प्रवाशांची सोय होईल. विकासवाहिनी कोविड काळापासून सुरत-नंदुरबार व नंदुरबार-भुसावळ (०९०७७/७८) अशा दोन टप्प्यांत धावते. पॅसेंजर सलग सुरत-भुसावळ थेट करण्यात यावी. १९००६, १९००८, १९१०६ भुसावळ-सुरत ह्या पॅसेजर व मेमु गाडी मध्यरात्री मागोमाग धावतात. त्याऐवजी गाड्या साधण्याने याड्या पहाटेपासून योग्य अंतराने होऊन रेल्वेला उत्पन्न मिळेल, शिंदखेडा रेल्वे स्थानकावर पुरी अहमदाबाद १२८४४/१२८४५ बरोनी अहमदाबाद १९४८३/१९४८५ भागलपूर सुरत २२९४७/२२९४८ प्रेरणा एक्सप्रेस २२१३७/२२१३८ यांना थांबा मिळावा.
हया निवेदनात रेल्वे संघर्ष समितीचे पश्चिम रेल्वे सल्लागार समितीचे प्रवीण महाजन, शिंदखेडा अध्यक्ष दादा मराठे, नरडाणा सिद्धार्थ सिसोदे सह कृउबा सभापती
नारायण पाटील,जिल्हा चिटणीस डी. एस. गिरासे, भाजपा शहराध्यक्ष जितेंद्र गिरासे,भाजपा तालुका अध्यक्ष मोतीलाल वाकडे, दीपक बागल, कृष्णा नगराळे, भरतरी ठाकुर, संजय मराठे, मनोज निकम, संजय अग्रवाल, राकेश अग्रवाल, अनिल सिसोदिया, राकेश माहेश्वरी, नरेंद्र गिरासे, पंकज चौधरी, भिकन बागवान, नदीम कुरेशी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
0 Comments