Header Ads Widget

*पुणे येथे भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा* 👉 *यादवराव सावंत यांना राष्ट्रीय आदर्श पत्रकार पुरस्कार प्रदान*



     शिंदखेडा ( प्रतिनिधी ) :-
ए.डी. फाऊंडेशनच्या वतीने भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा  पुणे येथे संपन्न झाला.          शिंदखेडा येथील जेष्ठ पत्रकार यादवराव सावंत यांना भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय आदर्श पत्रकार पुरस्काराने शाल, पुष्पगुछ,मेडल, सन्मानचिन्ह, सन्मान पत्र देवुन सहाय्यक आयुक्त महानगरपालिका पुणे वैशाली चव्हाण यांच्या हस्ते सन्मान पुर्वक प्रदान करण्यात आला. सदर पुरस्कार महाराष्ट्र राज्यातील विविध स्तरावरासह सहा जेष्ठ पत्रकारांना देवुन उत्तर महाराष्ट्रातुन एकमेव निवडीत यादवराव सावंत यांचा समावेश होता.                                                   या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा.डॉ. नितिन वाघमोडे, आयकर आयुक्त पुणे हे होते. तर अॅड. असीम सरोदे मुंबई उच्च न्यायालयातील कायदेतज्ञ यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले. यावेळी विशेष उपस्थिती मा.श्री. अनिल भिमराव जाहीर, तनिष्का फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य पुणे, ह.भ.प. तुकाराम बाबा महाराज मठाधिपती संत बागडेबाबा आश्रम, संख उपस्थिती होती. विशेष आकर्षण म्हणून  वैशाली मार्तंड चव्हाण सहाय्यक आयुक्त महानगरपालीका, राम मांडूरके सहाय्यक पोलीस आयुक्त पुणे, ममता भोई खानदेशी अभिनेत्री, श्वेता परदेशी मिसेस इंडिया २०२२, इंटरनॅशनल मॉडेल, प्राजक्ता मालुंजकर रिल स्टार /फेम आदीं खास उपस्थित होते. या सोहळ्यासाठी ए.डी. फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अशोक  गोरड, कार्यध्यक्ष महादेव महानुर व पदाधिकारी उपस्थित होते.सदर सोहळा  26 जुलै 2025 ग. दि. माडगुळकर नाट्यगृह, आकुर्डी स्टेशन, पिंपरी चिंचवड, पुणे येथे शानदार संपन्न झाला. शिंदखेडा येथील जेष्ठ पत्रकार यादवराव सावंत यांना पुरस्कार प्रदान झाल्यानंतर अभिनंदन व शुभेच्छाचा वर्षाव केला जात आहे.

Post a Comment

0 Comments