गाव म्हटलं की पार आलाच. पंचाची वेश आलीच. आड, विहिरी, गल्ली-बोळ, मंदिर आलंच. गावात सामुदायिक जीवनाला महत्त्व असते. धार्मिक, सामाजिक कार्यक्रमात अख्खा गाव एका दिलाने जमा होतो. पण रोज काही गावासाठी स्वयंपाक तयार होत नाही.
प्रत्येक जण त्याच्या घरीच जेवतो. हे गाव त्याला अपवाद आहे.
गुजरात राज्यातील मेहसाणा जिल्ह्यातील चंदनकी हे गाव देशात न्यारं आहे. कारण या गावात सर्व सोयी-सुविधा आहे. वीज, पाणी, पक्के रस्ते, स्वच्छता, शाळा, दवाखाना, बँक सर्व काही आहे. स्वच्छता, शौचालय आहे. पण या गावात कोणत्याच घरी स्वयंपाक होत नाही.
या गावाची लोकसंख्या अवघी 1300 इतकी आहे. त्यातील 900 जण हे नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने अमेरिका आणि देशातील इतर शहरात आहेत.
गावात 40 वरील मंडळी आणि वृद्ध नागरीक राहतात. दोनशे अडीचशे लोकांसाठी येथे एक सामुहिक स्वयंपाक घर आहे. तिथे माणसं कामाला आहेत. सकाळच्या नाष्ट्यापासून ते दुपारचे आणि रात्रीच्या जेवणापर्यंत येथे गावातील लोकांना स्वयंपाक करावा लागत नाही. एकाच ठिकाणी सर्व समाजाचे लोक रोज जेवण आणि नाष्टा करतात.
स्वातंत्र्यापासून या गावात निवडणुकच झालेली नाही. येथे सर्वच सोयी-सुविधा आहेत. या गावात पाहुणा जरी आला तरी त्याची जेवणाची व्यवस्था या सामुहिक स्वयंपाक घराकडूनच केली जाते. या गावातील घरात कित्येक वर्षांपासून चुल पेटलेली नाही.
हे गुजरातमधील एकमेव गाव आहे, जिथे रोज सामुहिक स्वयंपाकघरात भोजन तयार होते आणि गावकरी एकाच ठिकाणी बसून त्याचा आस्वाद घेतात. जेवणाचा रोजचा वेगवेगळा मेन्यू असतो. जेवण शाकाहारी आणि चांगले असावे यासाठी एक समिती त्याची गुणवत्ता तपासते.
0 Comments