Header Ads Widget

चोपडा ग्रामिण पोलीस स्टेशन यांची दमदार कामगिरी, ०४ गावठी कट्टे (अग्नीशस्त्र) व ८ जिवंत काडतुस वाहतुक करीत असतांना पुणे व धाराशिव जिल्ह्यातील दोन आरोपी जेरबंद


सुजाण नागरिक न्यूज. 

पारउमटी ता वरला जि. बडवाणी (मध्य प्रदेश) या गावाची सीमा महाराष्ट्र राज्याच्या चोपडा तालुक्यातील उमर्टी या गावाला लागुन आहे. पारउमर्टी येथे शिकलकर समाजाचे लोक राहत असुन ते पुर्वीपासुन अवैध अग्निशस्त्र व दारुगोळा बनवुन विक्री करीत असतात. त्यांच्या गैकृत्यास आळा बसावा याकरीता मागील एक महीन्यापासुन मा. पोलीस अधिक्षक सो जळगाव मा.डाँ महेश्वर रेड्डी, मा. अपर पोलीस अधिक्षक चाळीसगांव, कविता नेरकर मॅडम, मा. पोलीस उपअधिक्षक चोपडा उपविभाग, श्री आण्णासाहेब घोलप, यांच्या संकल्पनेतुन उमर्टी व सत्रासेन परिसरात २४वाय ०७ अशी नाकाबंदी लावण्यात आली होती 
दिनांक २३/०७/२०२५ रोजी सत्रासेन नाका येथे नाकाबंदी ड्युटीस असलेले पोकाँ/९२७ रावसाहेव एकनाथ पाटील. पोकाँ/७७५ घनश्याम हिम्मत पाटील यांना उमर्टी नाक्याकडुन सत्रासेन बाजुकडे एक मोटर सायकल वेगात येतांना दिसली. त्यांनी त्वरीत बँरीकेट लावले असता मोटर सायकल चालकाने मोटर सायकल वळवुन पळ काढण्याचा प्रयत्न केला असता पोकौं रावसाहेब पाटील यांनी शिताफिने पकडले असता ते मोटर सायकलसह खाली पडले. त्यावेळी त्यांच्यापैकी मोटर सायकल चालविणाऱ्या इसम नामे मंथन मोहन गायकवाड वय २२ वर्ष मुळरा. वडाळा ता. बार्शी जि.सोलापुर ह.मु. हडपसर मांजरी रोड टकले कॉलनी नं. १ गोपाळपट्टी मांजरी बु।। पुणे जि. पुणे याच्या बैंगेत ०३ अग्निशस्त्र व ०६ जिवंत काडतुसे तसेच मागे बसलेल्या इसम नामे स्वप्निल विभीषण कोकाटे वय ३२ वर्ष मुळरा. रुई ता. वाशी जि.धाराशिव याच्या कव्जात ०१ पिस्टल व ०२ जिवंत काडतुसे मिळून आली. सदर घटना पोकाँ रावसाहेब पाटील यांनी कळविल्यानंतर पो.नि अनिल भवारी, श्रेणी पोउपनि बापु सांळुंके, पोकॉ/१२५६ चेतन महाजन, पोकौं १२१३ विशाल पाटील, व इतर यांनी पकडून ठेवलेल्या वरील अग्निशस्त्र जवळ बाळगणा-या इसमांजवळ पोहोचुन पंचानाम्याद्वारे अग्निशस्त्र व काडतुसे जप्त केली.

अटक आरोपी मंथन मोहन गायकवाड व स्वप्निल विभीषण कोकाटे यांचेकडेस चौकशी करता अटक आरोपी यांनी त्याचे साथीदार आप्पासाहेब गायकवाड रा. गोजवड ता. वाशी जि. धाराशिव, कानीफनाथ बहीरट दोन्ही रा. बाबा पेट्रोल पंप जवळ संभाजीनगर हे त्यांचे सोबत असलेबाबत व ते धुळे येथे थांबलेले आहेत बाबत सांगीतल्याने त्यांचा धुळे येथे जावून शोध घेतला असता ते मिळून आले नाहीत. त्यांनी अग्नीशस्त्र उमर्टी येथुन आणण्यासाठी कानिफनाथ वहीरट याचे मित्राची मोटार सायकल धुळे येथून देवून मदत केली होती आणि ते स्वत धुळे येथे चारचाकी गाडी घेवुन धांवले होते. अटक आरोपी हे अग्नीशस्त्र घेवुन फरार आरोपी यांना चारचाकी गाडीतुन सुरक्षीत वाहतुक करण्यासाठी ताब्यात देणार होते अशी माहीती दिली त्याचप्रमाणे अटक आरोपी यांनी उमर्टी येथील शिकलकर टोपन नाव (पाजी) याने सदरची अग्निशस्त्र व काडतुसे ५०,०००/- रुपयात विक्री केल्याचे सांगीतले. अटक आरोपीपैकी मंधन गायकवाड याच्यावर अग्निशस्त्र विक्रीते गुन्हे दाखल असुन सदरचे अग्निशस्त्र आरोपी कोणास विक्री करणार होते याचा शोध पोलीस घेत आहेत.

Post a Comment

0 Comments