Header Ads Widget

नरडाणा स्टेशनवर उदना-पुणे रेल्वेसाठी लक्षवेधी रेल रोको आंदोलन-परिसरातील शेकडो नागरिक उतरले रेल्वे पटरीवर.


नरडाणा: 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी नरडाणा रेल्वे स्टेशनवर पश्चिम रेल्वेच्या ताप्ती सेक्शन वरून मुंबईला जाणाऱ्या खानदेश एक्सप्रेसच्या धर्तीवर उदना- जळगाव-पुणे ही नवीन रेल्वे सुरू करावी, तसेच सुरतला रोजगारानिमित्त जाणाऱी प्रचंड मोठी प्रवासी संख्या रात्री जाणाऱ्या  रेल्वे गाड्या दिवसा कराव्यात, मुंबई  जाणाऱ्या खानदेश एक्सप्रेसच्या वेळेत बदल करावा, नरडाणा स्टेशनवर लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा द्यावा, परिसरातील गावे, रहिवाशी व शेतकऱ्यांच्या
 सोयीसाठी नरडाणा येथे रेल्वे लाईनवर रेल्वे अंडरपास बोगदा मंजूर करावा, यासह अनेक वर्षापासून रखडलेल्या मागण्यांसाठी धुळे जिल्हा भाजपा रेल्वे प्रवास प्रकोष्ट संयोजक सिद्धार्थ सिसोदे यांच्या नेतृत्वात शेकडो नागरिक  रेल रोको आंदोलनात सहभागी होऊन रेल्वे पटरीवर उतरले होते. नरडाणा रेल्वे स्टेशनवर अशा प्रकारचे आंदोलन प्रथमच झाले.
     दुपारी नरडाणा पोलीस स्टेशनच्या आवार भिंतीच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी आलेल्या पण व राजशिष्टाचार तथा पालकमंत्री धुळे मा ना जयकुमार भाऊ रावळ यांना भेटून हे आंदोलन शासन विरोधी नसून लक्षवेधी  आहे अशी माहिती व निवेदनाची एक प्रत सिद्धार्थ सिसोदे यांनी त्यांना दिली. त्यांनी स्वतः केंद्रीय रेल्वे मंत्री मा. ना. अश्विनीजी वैष्णव यांना भेटून सर्व मागण्यावर मार्ग काढू व लवकरच उदना - पुना रेल्वे सुरु करू असे आश्वासन दिले.

नरडाणा हे मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्र.३ वरील व नरडाणा एमआयडीसी लगतचे महत्त्वाचे रेल्वे स्टेशन आहे. येथे अनेक वर्षांपासून लांब पल्ल्याच्या गाडीला थांबा मिळावा, रेल्वे अंडरपास बोगदा बनावा, तसेच पुण्याचे वाढते शैक्षणिक औद्योगिक व आयटी क्षेत्रातील वाढते महत्त्व व प्रवाशांची संख्या बघता प्रवाशांचा खर्च वेळ त्रास वाचावा यासाठी पश्चिम रेल्वेच्या ताप्ती सेक्शन वरून नव्याने उदना-जळगाव-पुणे गाडी सुरू करावी अशी मागणी आहे. वेळोवेळी मागणी करूनही पूर्ण होत नसल्यामुळे शेवटी रेल रोकोचा निर्णय घ्यावा लागला. नरडाणा बरोबरच दोंडाईचा येथे श्री प्रवीण महाजन यांच्याबरोबर मा.ना.जयकुमार भाऊ रावल यांचे वडील श्री.सरकार साहेबराव रावल स्वतः आंदोलनात सहभागी झाले, तर शिंदखेडा येथे श्री गोविंद मराठे यांच्या उपस्थितीत लक्षवेधी रेल्वे आंदोलन झाले. रेल्वे प्रशासनाने लवकरच मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले असे समजते.

आज सकाळ पासूनच आंदोलन करत्यांची नरडाणा रेल्वे स्टेशनवर गर्दी वाढायला लागली. याबरोबर पोलिसांची संख्याही वाढायला लागली. पोलिसबळाला दाद न देता शेकडो कार्यकर्ते रेल्वे पटरीवर उतरले 'हमारी मांगे पुरी करो, उदना-पुणे गाडी सुरू करो.' यासह अनेक घोषणांनी रेल्वे स्टेशन दुमदुमले. 'भुसावळ नंदुरबार पॅसेंजर' गाडीला अडवून शेवटी रेल्वेचे सी.एम.आय. रवी पांडे यांनी निवेदन स्वीकारून लवकरच रेल्वे मंत्र्यांपर्यंत आपल्या मागण्या पोहचवू व यातून मार्ग काढू असे आश्वासन दिले. नरडाणा पोलीस स्टेशनचे ए.पी.आय. निलेश मोरे साहेब यांनीही आंदोलन कर्त्यांना शांत केले. यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले परंतु पुढील तारखे पर्यंत वरिल मागण्या पूर्ण न झाल्यास रेल्वे पटरीवर झोपून अमरण आंदोलन करू असा इशारा सिद्धार्थ सिसोदे, संजीवनी सिसोदे, राजेश बोरसे, प्रवीण देसले, संजय खैरनार, विश्वास देसले, रमेश सिसोदे, शंकर सिसोदे, सागर सूर्यवंशी, प्रदीप चोरडिया, निंबा दादा साळुंखे, मन्साराम बोरसे, लखन नेतले, राकेश नेतले, गणेश मोरे, जिजाबराव सिसोदे, संदीप निकम, गोरख भामरे, सुनील भामरे, जगदीश पवार, अंकुश साळुंखे, मयूर सिसोदे, संजय बोरसे, विजय बोरसे, संदीप कदम, सतीलाल देसले सर, बंडू पाटील, महेश सिसोदे, विशाल मलकेकर, सुनील पाटील, बाळा पवार, दीपक महाराज, रोहित बोरसे, ज्योती फुलपगारे, मोहित सिसोदे, हरीश सिसोदे, जगदीश कोळी, तेजस कलाल सह अनेक ग्रामस्थ व प्रवासी आंदोलनात सहभागी झाले होते.

Post a Comment

0 Comments