Header Ads Widget

*हर घर तिरंगा अभियान अंतर्गत जनता हायस्कूल मध्ये शिंदखेडा नगरपंचायत चे मुख्यअधिकारी श्री श्रीकांत फागणेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण* .*

   शिंदखेडा येथील जनता हायस्कूल कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात हर घर तिरंगा अभियान अंतर्गत  संपूर्ण भारतात सुरू असलेल्या तीन दिवसीय ध्वजारोहण कार्यक्रमाचे दुसऱ्या दिवसाचे ध्वजारोहण  शिंदखेडा नगरपंचायत चे मुख्यअधिकारी श्रीकांत शरद फागणेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
    सदर कार्यक्रम प्रसंगी नगरपंचायत पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी श्री महेंद्र सैंदाणे,प्राचार्य श्री एस.एस पाटील पर्यवेक्षक श्री बी जे पाटील ज्येष्ठ शिक्षक श्री एस के जाधव श्री डी एच सोनवणे ज्येष्ठ लिपिक श्री किशोर गोरख पाटील तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. 
  या प्रसंगी  संपूर्ण विश्वाच्या माऊली तसेच विश्वशांतीसाठी पसायदान लिहिणारे संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या 750 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले. तसेच सर्व विद्यार्थ्यांकडून पसायदान म्हणून घेत त्या पसायदानाचा अर्थ श्रीमती पी ए पाटील, व श्रीमती आर.ए पाटील यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितला याप्रसंगी श्रीमती पी ए पाटील यांनी संत ज्ञानेश्वर महाराज  यांनी लिहिलेल्या ग्रंथांचा तसेच हरीपाठाचा परिचय विद्यार्थ्यांना आपल्या प्रास्ताविकातून करून दिला.
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एस.ए.पाटील यांनी तर मान्यवरांचे आभार श्री ए. टी.पाटील यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments